Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : प्राध्यापकांना मुख्यालयी हजर होण्याचे आदेश - order to...

navi mumbai News : प्राध्यापकांना मुख्यालयी हजर होण्याचे आदेश – order to the professors to attend the headquarters


लॉकडाउनमुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठा पेच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लॉकडाउनमुळे राज्यातील इतर भागात अडकलेल्या प्राध्यापक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज, रविवारी त्यांच्या मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश फतवा विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत. प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी विद्यापीठात त्यांच्या कार्यालयात हजर नसल्याने अत्यावश्यक कामांसाठी त्यांची मदत मिळत नसल्याचे स्पष्ट करून विद्यापीठ प्रशासनाने हे आदेश काढले आहेत. दरम्यान, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असून, जिल्हांतर्गत प्रवासासाठीही पास लागत असल्याने, ही मंडळी मुख्यालयी कसे उपस्थित राहायचे, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे.

विद्यापीठातील काही सेवक, कर्मचारी व अधिकारी पूर्वपरवानगी न घेता विद्यापीठात; तसेच मुख्यालयी हजर नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक कामाच्या वेळी ते सेवा देत नाहीत, असे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या कालावधीत संचारबंदीमुळे किंवा अन्य कारणांमुळे इतर ठिकाणी अडकले असतील, तर त्या संबंधितांनी रविवारपर्यंत त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, जेणेकरून अत्यावश्यक; तसेच तातडीच्या बाबींसाठी आवश्यकतेनुसार त्यांच्या सेवा उपलब्ध होतील. या सर्वांनी मुख्यालयाच्या ठिकाणी हजर झाल्याबाबतचा अनुपालन अहवाल प्रशासन शिक्षकेतर कक्षास ई-मेलद्वारे सादर करावा, असे आदेश विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले आहेत.

विद्यापीठात सध्या परीक्षांच्या कामांसोबतच प्रवेश प्रक्रियेच्या कामांचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे हे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, लॉकडाउनमध्ये सुरू असलेल्या संचारबंदीत प्राध्यापक, कर्मचारी आणि अधिकारी विद्यापीठात किंवा मुख्यालयी कसे पोहोचतील, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Recent Comments