Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : बंद रुग्णालयांना नोटिसा - notice to closed hospitals

navi mumbai News : बंद रुग्णालयांना नोटिसा – notice to closed hospitals


मटा इम्पॅक्ट

नवी मुंबई पालिकेकडून अखेर कारवाईचे पाऊल

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून अनेक खासगी दवाखाने, रुग्णालये बंद झाली आहेत. दवाखान्यांत करोनाचा रुग्ण येऊन त्यातून संसर्ग वाढण्याची भीती अनेक डॉक्टरांना वाटत होती. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी बंद झालेले अनेक दवाखाने अजूनही सुरू करण्यात आलेले नाहीत. दवाखाने आणि रुग्णालये सुरू करण्यासाठी पालिकेने दोनवेळा त्यांना स्मरणपत्र पाठवून सूचनाही केल्या होत्या. मात्र त्यानंतरही अनेक रुग्णालये, दवाखाने सुरू झालेले नाहीत. त्यामुळे आता असे दवाखाने आणि रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या आहेत.

आधीच वाढत्या करोना रुग्णांमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागावर असलेला ताण वाढत आहे. त्यासाठी पालिकेची रुग्णालये करोना रुग्णालयात रूपांतरित करण्यात आल्यापासून तर सर्वसामान्य नागरिकांना करोनाव्यतिरिक्त इतर आजारांसाठी उपचार करताना दवाखाने शोधावे लागत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना इतर आजारासाठी धावाधाव कारवाई लागत आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे अनेक लोकांनी तक्रारीही केल्या आहेत. नागरिकांना उपचार देण्यासाठी दवाखाने, रुग्णालये सुरू करा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले होते. मात्र तरीही काही दवाखाने बंदच ठेवण्यात आली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवेची अधिक गरज असताना दवाखाने बंद ठेवणे, अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये या बंद रुग्णालयांबाबत बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. रुग्णांचे हाल होत असल्याबाबत माहितीही दिली होती. अखेर त्याची दखल घेत महापलिकेने आता अशा बंद असलेल्या रुग्णालयाला नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस देऊनही रुग्णालय सुरू न झाल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव इंडियन मेडिकल कौन्सिलकडे पाठवला जाईल, असेही पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

‘मेस्मा’अंतर्गत नोटिसा

विजया मॅटर्निटी नर्सिंग होम, सेक्टर १७,वाशी

दिते रुग्णालय, सेक्टर १०, कोपरखैरणे

सुखद रुग्णालय, सेक्टर ६, कोपरखैरणे

श्री दत्त मोहिनी रुग्णालय, सेक्टर १९, नेरूळ

जस्मिन रुग्णालय, ऐरोलीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Heavy Vehicles: अखेर अवजड वाहनांना बंदी! – heavy vehicles finally banned from nandur to jail road nashik

म. टा. वृत्तसेवा, पंचवटीजेलरोडच्या सिंधी कॉलनीसमोर बुधवारी दाम्पत्याला ट्रकने चिरडल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांना जाग आली. नांदूर नाक्यापासून जेलरोडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी...

festival special trains: Special Trains 2020: पाहा, सणासुदीसाठी नव्या स्पेशल ट्रेन कधी धावणार? – irctc see festival special trains full list 2020 by indian...

नवी दिल्ली: रेल्वेने सणासुदीचे दिवस पाहता काही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यांमध्ये काही दररोज चालणाऱ्या ट्रेन असून काही साप्ताहिक ट्रेन आहेत....

Recent Comments