Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : ‘मदत व पुनर्वसनाच्या कामात हातभार लावा’ - 'contribute...

navi mumbai News : ‘मदत व पुनर्वसनाच्या कामात हातभार लावा’ – ‘contribute to relief and rehabilitation work’


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीनंतर मदत व पुनर्वसनाच्या कामात प्रशासनासोबत मदतीला उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बुधवारी केले. तर, चक्रीवादळाचा जोर पूर्णपणे ओसरेपर्यंत कोकणातील जनतेने घराबाहेर पडू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा, असे पवार म्हणाले.

दरम्यान, ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा जोर ओसरेपर्यंत कोणीही घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सकाळी केले. प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असेही पवार म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

Recent Comments