Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: मद्यविक्रीला आठवले यांचा विरोध - athavale opposes sale of...

navi mumbai News: मद्यविक्रीला आठवले यांचा विरोध – athavale opposes sale of liquor


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘गावागावातील म्हणते पारू, लॉकडाउनमुळे सुटली आहे माझ्या नवऱ्याची दारू’, अशी शीघ्र कविता रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली आहे. त्यामुळे थोडासा महसूल मिळविण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील दारूची दुकाने अजिबात सुरू करता कामा नये. त्यामुळे कोट्यवधी कुटुंबातील आनंदावर विरजण पडेल, असे आठवले यांचे म्हणणे आहे.

करोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी लॉकडाउन पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे दारूची दुकानेही लॉकडाउनच्या बंदच ठेवावीत, अशी मागणी आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

लॉकडाउनच्या काळात राज्य सरकारचा महसूल वाढण्यासाठी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लॉकडाउनच्या काळात दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांच्या त्या मागणीस आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. लॉकडाउनमध्ये कोठेही दारू मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. ज्यांचे दारूचे व्यसन सुटले, अशांच्या कुटुंबात आनंदीआनंद आहे. आता पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला तर तो निर्णय चुकीचा ठरेल, असे रामदास आठवले यांनी संगितले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PMJJY available in Postal Payment bank: PMJJY जीवन ज्योती योजना; पोस्ट पेमेंट बँकेतही मिळणार जीवन ज्योती विमा – jeevan jyoti yojana now available in...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्येही (आयपीपीबी) आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने पीएनबी मेटलाइफ...

father and son found dead in apegaon paithan: बिबट्या जाळ्यात येईना; तीन जिल्ह्यात दहशत – father and son found dead in apegaon paithan due...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादबिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात घडल्यानंतर या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पैठण परिसरातील...

Recent Comments