Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : माणगावमध्ये १४ रुग्ण वाढले - in mangaon, 14...

navi mumbai News : माणगावमध्ये १४ रुग्ण वाढले – in mangaon, 14 patients were added


उरण : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे करोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून शनिवारी दिवसभरात १४ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या ३०१ असून उपचारानंतर ३७३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, आजमितीस रायगड जिल्ह्यात ३३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आठवडाभरापूर्वी मुंबईहून माणगाव तालुक्यातील कुशेडे येथे आलेल्या एका तरुणाला करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर, त्याच्या संपर्कात असलेले कुटुंबीय आणि अन्य व्यक्तींनादेखील करोनाची लागण झाल्यानंतर गेल्या आठवडाभरात आणखी चार व्यक्तींना संसर्ग झाला होता. त्यातच, शनिवारी आणखी १४ रुग्ण आढळून आले. तालुक्यातील सणसवाडी, मुठवली, खर्डी, नगरोळी, पन्हळघर, पळसगाव, कालवण, चरई, कळमजे, कवीळवाळ खुर्द या परिसरात करोनाबाधित आढळले आहेत. आजमितीस एकही रुग्ण नसलेल्या रोहा तालुक्यात शनिवारी पाच करोनाबधित आढळले असून पोलादपूर येथे तीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या काही दिवसांत रायगड जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांचा आकडा वाढला असून म्हसळा येथे एक, श्रीवर्धन आणि कर्जत येथे दोन, महाड येथे तीन आणि पनवेल येथील २१ रुग्णांचा समावेश आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bill Gates: हे कसं घडलं? बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी! – bill gates became americas biggest farmer bought 242,000 acres land

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी झाले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिेकेतील १८ राज्यांमधील दोन लाख ४२ हजार एकर...

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले...

Recent Comments