Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : मातृशक्ती, दुर्गावाहिनीचा अभ्यासवर्ग ऑनलाइन - matrishakti, durgavahini study...

navi mumbai News : मातृशक्ती, दुर्गावाहिनीचा अभ्यासवर्ग ऑनलाइन – matrishakti, durgavahini study class online


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bदेवगिरी प्रांताच्या मातृशक्ती व दुर्गा वाहिनी विभागाचा अभ्यासवर्ग नुकताच उत्साहात झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितरित्या या तीन दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन शक्य नसल्याने ऑनलाइन पद्धतीने त्याचे आयोजन करण्यात आले होते.

देवगिरी प्रांतातील १४ जिल्ह्यातील एकूण २२५ महिला या अभ्यासवर्गात सहभागी झाल्या. सकाळी सहा ते सात प्रात:स्मरण व योगव्यायाम, अकरा ते साडेअकरा वाजेदरम्यान कृती सत्र, दुपारी बौद्धिक सत्र, सायंकाळी सत्संग, रात्री आठ वाजता चर्चासत्र असे वर्गाचे वेळापत्रक होते. बौद्धिक सत्रात केंद्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांनी कुटुंब प्रबोधन, प्रमोद देशपांडे यांनी संघटन कौशल्य, प्रांतमंत्री अनंत पांडे यांनी भारतीय वीरांगणा या विषयांवर मार्गदर्शन केले. क्षेत्र संघटन मंत्री श्रीरंग राजे यांनी विश्व हिंदू परिषदेची माहिती दिली. चर्चासत्रात सेवा विभाग, परिवार प्रबोधन हे विषय झाले. वर्ग यशस्वी करण्यासाठी प्रांत अध्यक्ष आप्पा बारगजे, प्रांत मंत्री अनंत पांडे, प्रांत संघटन मंत्री अभिजित हरकरे, कुंदा अंदुरे, धोंडूअण्णा आदींनी प्रयत्न केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rain in Nashik: ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार – nashik also received heavy rains in october month

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत १४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बागलाण तालुक्यात २८१ तर...

gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव – Gold Silver Price Today

मुंबई : कमॉडिटी बाजारात ५०८८८ रुपये आहे. चांदीच्या दरात मात्र ४७५ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६२३८१ रुपये झाला आहे....

Recent Comments