Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : 'मातोश्री'वरील तीन पोलिस बाधित - three policemen obstructed...

navi mumbai News : ‘मातोश्री’वरील तीन पोलिस बाधित – three policemen obstructed on ‘matoshri’


यापूर्वी ‘वर्षा’वरील पोलिसाला बाधा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर बंदोबस्ताला असलेल्या तीन पोलिसांना करोना विषाणूचा लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. याआधी मातोश्री बंगल्याजवळील चहावाला आणि वर्षा शासकीय निवासस्थानी तैनात पोलिसाला लागण झाल्याचे समोर आले होते. त्यातच राज्यातील करोनाबाधित पोलिसांचा आकडा ३४२वर पोहोचला आहे.

कलानगर परिसरातील चहावाला करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मातोश्री बंगल्यावर बंदोबस्ताला असलेल्या सर्व पोलिसांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी बंदोबस्तावरील सर्व पोलिसांना बदलण्यात आले होते. सशस्त्र पोलिस दलातील पोलिसांना काही दिवसांपूर्वी मातोश्री येथे बंदोबस्ताला पाठविण्यात आले होते. परिमंडळ आठमधील सर्वच पोलिसांची खबरदारी म्हणून वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. बंदोबस्तावरील पोलिसांची देखील चाचणी करण्यात आली आणि त्यापैकी तीन पोलिसांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. या तिघांपैकी दोघे शुक्रवारी रात्री ड्युटी करून घरी परतले होते, तर एक पोलिस सकाळी कर्तव्यावर हजर झाला होता. या तिघांचेही सांताक्रूझ येथे विलगीकरण करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलिसांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची देखील वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना होणारी लागण म्हणजे मुंबई पोलिसांसाठी चिंतेची बाब आहे.

लोकांशी थेट संपर्क

नाकाबंदी, वस्त्यांमधील गस्त या दरम्यान लोकांशी थेट संपर्क येत असल्याने पोलिसांना प्रादुर्भाव अधिक होत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांचा आकडा चिंता वाढविणारा आहे. ३४२ पोलिसांना लागण झाली असून, यामध्ये ५२ अधिकारी आणि २९१ कर्मचारी यांचा समावेश आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. ३० पेक्षा अधिक पोलिस करोनामुक्त झाले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tim Paine: IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर आली ही वाईट वेळ, जगासमोर लाज गेली… – ind vs aus : australia captain...

नवी दिल्ली, IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेनवर वाईट वेळ आली आहे. या एका गोष्टीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर पेनची...

Recent Comments