Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : मुंबईतील यंत्रणा बचावासाठी सज्ज - the system in...

navi mumbai News : मुंबईतील यंत्रणा बचावासाठी सज्ज – the system in mumbai is ready for rescue


नौदलाच्या युद्धनौकांची बचावकार्यासाठी मदत; जलतरण चमूंचाही समावेश

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

निसर्ग वादळ काळात नागरिकांच्या बचावकार्यासाठी नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात सज्ज झाल्या आहेत. मुंबई तसेच परिसरासाठी आठ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यात जलतरण चमूचाही समावेश आहे.

‘निसर्ग’ वादळ रायगड ते ठाणे किनारपट्टीदरम्यान धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार या सर्व किनारपट्टी भागात नागरिकांच्या बचावकार्यासाठी नौदलाने त्यांच्या महत्त्वाच्या नौका मंगळवारी दुपारी मुंबईच्या गोदीतून बाहेर काढल्या. या नौका रायगड ते पालघरदरम्यानच्या अरबी समुद्रात; परंतु किनारपट्टीजवळ सज्ज करण्यात आल्या आहेत. वादळादरम्यान किनारपट्टीवरील भागात नागरिक अडकल्यास त्यांना या नौकांद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल. या कामासाठी नौदलाकडून उभयचर श्रेणीतील जहाजाचा उपयोग केला जातो. परंतु, पश्चिम कमांडकडे असे जहाज नाही. यामुळेच ‘आयएनएस कोलकाता’ व ‘आयएनएस मुंबई’ श्रेणीतील विनाशिका; तसेच ‘आयएनएस गोमती’ श्रेणीतील ‘फ्रिगिट्स’ या कामासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यास तेथून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी पाच बचाव पथके कुलाबा व मानखुर्द येथे तैनात आहेत. यामध्ये रबरी बोट, वैद्यकीय सहायक व जीवरक्षक सामग्रीचा समावेश असेल. तसेच, तीन जलतरण चमूदेखील सज्ज आहेत. हे आठ चमू मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई व कल्याण-डोंबिवली या सर्व परिसरासाठी सेवा देणार आहे. या पथकांची ने-आण करण्यासह नागरिकांना वेळप्रसंगी सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी हेलिकॉप्टरदेखील कुलाब्यातील आयएनएस शिक्रा या तळावर सज्ज करण्यात आले आहेत.

तटरक्षक दल समुद्रात

वादळाआधी सर्व मच्छिमारांना किनारपट्टीवर जाण्याचे आवाहन करण्यासाठी तटरक्षक दलाने गोवा ते गुजरातपर्यंतच्या समुद्रात मोहीम हाती घेतली आहे. मच्छिमार नौकांना परत पाठविण्यासाठी विमानाचे साहाय्यदेखील घेतले जात आहे. डॉर्निअर विमानाद्वारे समुद्रात सातत्याने फेऱ्या मारल्या जात आहेत.

‘एनडीआरएफ’ची जनजागृती

या वादळाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दहा तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत तीन, रायगड आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी दोन; तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एका तुकडीचा समावेश आहे, अशी माहिती एनडीआरएफ, महाराष्ट्रचे प्रमुख कमांडर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली आहे. ‘एनडीआरएफ’च्या तुकड्यांनी मंगळवारी संबंधित भागांची पाहणी केली. तसेच या चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. वादळापासून बचावासाठी किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments