Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : मुंबईत ‘सीलबंद’ इमारती - 'sealed' buildings in mumbai

navi mumbai News : मुंबईत ‘सीलबंद’ इमारती – ‘sealed’ buildings in mumbai


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

एखाद्या भागात करोनाचा रुग्ण सापडल्यास आतापर्यंत संबंधित परिसर सरसकट प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित करून त्या भागावर अधिक लक्ष ठेवले जात असे. मात्र, एकाच परिसरात एकापेक्षा अधिक इमारतींना किंवा भागांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यामुळे पोलिस व पालिकेच्या मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे आता प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त ‘सीलबंद’ इमारती ही आणखी एक वर्गवारी करण्यात आली आहे. या पुनर्रचनेनुसार मुंबईत आता ६६१ प्रतिबंधित क्षेत्रे व १११० सीलबंद इमारती जाहीर करण्यात आल्या आहेत.

एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित अथवा लक्षणे नसलेले रुग्ण आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येईल. हे करताना पॉझिटिव्ह रुग्ण रहात असलेल्या घराची व इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन इमारत किंवा इमारतीचा काही भाग ‘सीलबंद’ केला जाणार आहे. अशा इमारतीच्या सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीस याची माहिती देण्यात येईल. तसेच सोसायटीतील इतर व्यक्तींना बाधा होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजनांबाबत माहिती व मार्गदर्शन पालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे देण्यात येणार आहे. ‘सीलबंद’ इमारतींबाबत करण्यात येणारी ही कार्यवाही सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या किंवा सोसायटीने निश्चित केलेल्या सदस्यांच्या समितीच्या पुढाकाराने केली जाणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना

प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना करताना एकाच परिसरातील एकापेक्षा अधिक इमारती किंवा एकापेक्षा अधिक भाग वा घरे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असल्यास आता अशा परिसरांना एकच प्रतिबंधित क्षेत्र म्हटले जाणार आहे. या परिसरात जाणाऱ्या मार्गांवर निर्बंध घालण्यात आले असून तेथे पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

‘आरोग्य सेतू’ बंधनकारक

सोसायटीतील ज्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे विलगीकरण करण्यात आले आहे किंवा जी व्यक्ती बाधित असूनही लक्षणे नसल्यामुळे घरच्या घरीच विलगीकरण करण्यात आले आहे, अशा व्यक्तींच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू ॲप इन्स्टॉल करावे लागेल.

कमी मनुष्यबळाचा वापर

प्रत्येक इमारतीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे पोलिसांची नियुक्ती करण्याऐवजी कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी काम करणे शक्य होणार आहे. पोलिस दल व पालिकेचे अधिकारी व कर्मचारीदेखील या परिसरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यासह इतर बाबींचेही नियोजन करीत आहेत.

वेळोवेळी खातरजमा

बाधित रुग्णांच्या घरातील व्यक्ती, शेजारच्या किंवा त्याच मजल्यावरील व्यक्ती, तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचेही घरात विलगीकरण केले जाणार आहे. लक्षणे असलेले बाधित रुग्ण आणि घरी विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्ती, यांच्याद्वारे आणि आणि सोसायटीतील इतर सदस्य व रहिवाशांद्वारे संबंधित नियमांचे काटेकोर पालन होत असल्याची खातरजमा समितीद्वारे वेळोवेळी करण्यात येईल. यामध्ये सोसायटीतील सर्व सदस्यांद्वारे सामाजिक वावर, मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे.

रहिवाशांना घरपोच सामान

सीलबंद इमारतींसाठीच्या समितीद्वारे स्थानिक किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, औषधांची दुकाने यांच्याशी संपर्क साधून सोसायटीच्या गरजांनुसार वस्तूंची वा सामानाची मागणी नोंदवली जाणार आहे. मागणी केलेले सामान किंवा वस्तू सोसायटीच्या प्रवेशद्वारावर दुकानदारांद्वारे वा विक्रेत्यांद्वारे पोहोचवल्या जातील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

तंबाखूजन्य पदार्थांचे नाशिकरोडला घबाड – police seize banned tobacco items worth rs 11 lakhs

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोडनाशिकमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा चोरटा व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. नाशिकरोड येथे अन्न व औषध प्रशासनाने...

nitish kumar cabinet expansion likely soon: बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, कुणाची लागणार वर्णी? – bihar cm nitish kumar cabinet expansion likely soon

पाटणाः बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर राजकारण तापलं असताना नितीशकुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग ( nitish kumar cabinet expansion likely soon ) आला...

US Inauguration Day 2021 Live Update: Joe Biden and Harris Inauguration Day Live बायडन होणार अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष – US Presidential Elections Joe...

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात होत असून आज, बुधवारी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन, तर उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस पद आणि...

Recent Comments