Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत २८० कोटी रुपये जमा -...

navi mumbai News: मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत २८० कोटी रुपये जमा – so far, rs 280 crore has been deposited in the cm assistance fund


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

आयटीसी प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. करोनाविरोधी युद्धात आर्थिक मदतीबरोबरच अन्नधान्य वितरण, स्वच्छताविषयक साधनांचे वाटप तसेच गरजूंच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या कामातही पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २८० कोटी रुपये जमा झाले आहेत.

‘मदत फक्त पैशात सांगता किंवा मोजता येत नाही. कुणी अडकलेल्या नागरिकांना जेवण देत आहे. कुणी रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करत आहेत. ही लाखमोलाची साथ आहे. यापुढेही अशाच सहकार्याची आणि मदतीची अपेक्षा आहे. आपण सर्वजण मिळून करोनाविरुद्धचे हे युद्ध नक्की जिंकू’, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मदतीचे आवाहन

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९

बँकेचे बचत खाते क्रमांक- ३९२३९५९१७२०

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई ४०००२३

शाखा कोड ००३००

आयएफएससी कोड SBIN0000300

निधीसीठी दिल्या जाणाऱ्या देणग्यांना आयकर अधिनियम १९६१च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून शंभर टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments