Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : याद्या निर्मितीचे काम सुरू - production of lists...

navi mumbai News : याद्या निर्मितीचे काम सुरू – production of lists started


शहरातील याद्या करणार पोलिस उपायुक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीतून परराज्यांत किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू आणि अन्य व्यक्तींच्या याद्या पोलिस उपायुक्तांकडून आणि ग्रामीण भागात संबंधित तहसीलदारांकडून तयार करण्यात येणार आहेत. सध्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, संबंधित नागरिक जाणाऱ्या भागांतील जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यावरच पास दिले जाणार आहेत’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी सांगितले.

राज्य सरकारने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतून प्रामुख्याने मजूर आणि कामगार यांना मूळगावी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांना मूळगावी जाण्यासाठी प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही महापालिकांच्या हद्दीत पोलिस आयुक्तालयांकडून पोलिस उपायुक्त नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून प्रक्रिया केली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संबंधित तहसीलदारांकडून कार्यवाही होणार आहे. सध्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. या याद्या पोलिस उपायुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित राज्य किंवा जिल्ह्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. तेथील जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर पास देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

‘नागरिकांना covid19.mhpolice.in ही लिंक देण्यात आली आहे. त्यावर ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यावर करोनाबाबतची लक्षणे नसल्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शहर आणि जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान २० नागरिकांची करोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असेही ते म्हणाले.

……………पास मिळण्याची प्रक्रिया

– नागरिकांना https://covid19.mhpolice.in/ या लिंकवर माहिती भरावी लागणार आहे.

– माहिती भरताना सध्याचा फोटो, फ्लू सदृश आजार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि आधारकार्ड जोडावे लागणार आहे.

– अर्ज भरल्यावर टोकन आयडी दिला जाणार.

– टोकन आयडीवरून अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती समजणार.

– अर्ज मंजूर झाल्यानंतर टोकन आयडीद्वारे पास डाउनलोड करता येणार.

– वाहनांसाठी परवाना घ्यायचा असल्यास वाहनाविषयीची माहिती द्यावी लागेल.

– मूळ गावी जाताना पासची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी सोबत ठेवावी लागणार.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

citrus estate: राज्य सरकारनं जाहीर केलेला ‘सिट्रस इस्टेट’ प्रकल्प नेमका आहे काय? – citrus estate to be set up in vidarbha; ajit pawar announce

हायलाइट्स:सिट्रेस इस्टेट प्रकल्प निर्माण करण्याचा सरकारचा मानसआज सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा६२ एकर जागेवर 'सिट्रस इस्टेट' स्थापना करण्यात येणारमुंबईः उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री...

single by choice: स्वेच्छेने विवाहास नकार देत ‘त्यांची’ वेगळी वाट; स्वकर्तृत्वावर घेताहेत भरारी – single by choice: now most of india’s women reject marriage...

नाशिक : मुलीच्या वयाची पंचविशी जवळ आली, की आई-वडील, नातेवाईक, शेजारचे, ओळखीतले, जवळचे-दूरचे सर्वांनाच त्या मुलीच्या लग्नाची 'चिंता' सतावायला लागते. मुलीकडे उत्तम शिक्षण,...

Chennai Super Kings Full Schedule Fixtures Timing And Team – IPL 2021 Chennai Super Kings Schedule: चेपॉक नव्हे तर हे असेल धोनीचे होम ग्राउंड,...

मुंबई: IPL 2021 आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेची सुरूवात ९ एप्रिलपासून होणार असून पहिली लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल...

indian idol 12: Himesh Reshammiya Breaks The Silence On Indian Idol 12 Is Going To Be Off Air Soon – कमी TRP मुळे इंडियन...

हायलाइट्स:इंडियन आयडलचा १२ सीझन लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चाशोचा टीआरपी कमी असल्यानं शो बंद होणार असं बोललं जात आहेगायक आणि परीक्षक हिमेश रेशमियानं...

Recent Comments