Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: राजेश टोपेंच्या कामांचे दानवेंकडून कौतुक - rajesh tope's work...

navi mumbai News: राजेश टोपेंच्या कामांचे दानवेंकडून कौतुक – rajesh tope’s work is appreciated by danve


म. टा. प्रतिनिधी, जालना

करोना संसर्गाच्या साथीच्या विरोधातील लढ्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे कौतुकास्पद काम करत आहेत. त्यांच्या कामांवर खूष आहोत, असे म्हणत केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोपे यांचे शनिवारी भरभरून कौतुक केले. दानवे, खोतकर आणि गोरंट्याल यांनी एकत्रितपणे टोपे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या त्यांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी तीन मोबाइल मेडिकल व्हॅन दिल्या आहेत. या व्हॅनच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात दानवे बोलत होते. टोपे यांच्या व्यक्तीमत्वातील अनेक चांगल्या गुणांची या पार्श्वभूमीवर जवळून ओळख झाली. ते शांतपणे पूर्ण विचार करून योग्य निर्णय घेतात. अशा प्रकारच्या परिस्थितीत नेत्याची कसोटी लागते. या सगळ्या परीक्षेत टोपे हे आजच्या घडीला पहिल्या नंबरवर असल्याचे दानवे यांनी सांगितले.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजेश टोपे यांच्या काम करण्याच्या शैलीवर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाधान व्यक्त केले. आमदार गोरंट्याल यांनी जालन्यात करोना संसर्गाच्या साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी टोपे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाला मनापासून दाद दिली पाहिजे असे सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, ज्येष्ठ उद्योजक किशोर अग्रवाल, अर्जुन गेही, हस्तीमल बंब यावेळी उपस्थित होते.

जनरल मर्चंट, व्यापारी महासंघ, मिश्री मेडिकल कॉलेज, औषधी संघटना, जिल्हा परिषद सामान्य रूग्णालय, आरोग्य विभाग या सगळ्या संस्थेच्या समन्वयाने मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MNS morcha: पुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा मोर्चा, शहरप्रमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात – mns morcha on electricity bill pune city chief ajay shinde and...

पुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेच्या आंदोलनाआधीच पोलिसांनी शहरप्रमुख अजय शिंदे यांच्यासह ५०-६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. फरासखाना पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन गेले. त्यामुळे आक्रमक झालेल्या...

corona infection from food: अन्नातून करोना संसर्ग; ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food but lack of concrete evidence says infectious diseases clinic...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून घरी...

Recent Comments