Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : राज्यातील रुग्णसंख्या ३३ हजारांच्या पुढे - the number...

navi mumbai News : राज्यातील रुग्णसंख्या ३३ हजारांच्या पुढे – the number of patients in the state is more than 33,000


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव शहरातील करोना हॉटस्पॉट असलेल्या भागातील सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. करोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बरे झालेल्या रुग्णांपैकी निम्मे रुग्ण एकाच आठवड्याच्या कालावधीतील असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. दरम्यान, राज्यातील रुग्णांची संख्या ३३ हजार ५३ झाली आहे.

आत्तापर्यंत सर्वाधिक ६००हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७ हजार ६८८ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. केंद्र शासनाने सुमारे एक आठवड्यापूर्वी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत सुधारित धोरण जाहीर केले होते. त्यानुसार कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना १४ दिवसांऐवजी १०व्या दिवशी घरी सोडण्यात येत आहे. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे, असे ते म्हणाले.

गेल्या रविवारी म्हणजे १० मे रोजी ३९९ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ११ मे रोजी ५८७, १२ मे रोजी ३३९, १३ मे रोजी ४२२, १४ मे रोजी ५१२, १५ मे रोजी ५०५, १६ मे रोजी ५२४ आणि १७ मे रोजी ६००हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे या एका आठवड्यामध्ये ३ हजार ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

राज्यात करोनाबाधितांचा आकडा ३३ हजारावर

राज्यात रविवारी २ हजार ३४७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एका दिवसातील नोंद झालेली ही सर्वांत मोठी रुग्ण संख्या आहे. यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांचा आकडा ३३ हजार ०५३ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत ६३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात सर्वाधिक मुंबईतील ३८ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात नऊ रुग्णांचा, तर औरंगाबाद शहरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहर व रायगडमध्ये प्रत्येकी तीन, पनवेल, ठाणे जिल्हा, लातूर आणि अमरावती शहरात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने २० हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील करोनाबळींची एकूण संख्या १ हजार १९८ इतकी झाली असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rto office aurangabad: ऑनलाइन अपॉइंटनेंट अचानक ऑफलाइन – few vehicle owners complaint against rto office to transport commissioner in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादआरटीओ कार्यालयात वाहनाचे फिटनेस घेण्यासाठी वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र, बॅकलॉगच्या नावाखाली या वाहनांच्या फिटनेसचे दिनांक बदलून, त्यांना ऑफलाइन...

jayant patil on devendra fadanvis: अर्थसंकल्पावर फडणवीसांची टीका; राष्ट्रवादीने दिले ‘हे’ उत्तर – jayant patil on devendra fadanvis over maharashtra budget

हायलाइट्स:अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर केलाअर्थसंकल्पावरुन देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्रफडणवीसांना जयंत पाटलांनी दिलं उत्तरमुंबईः आज विधीमंडळात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला....

PM Modi: womens day pm modi : महिला दिनाला PM मोदींची जोरदार ऑनलाइन खरेदी, निवडणुका होत असलेल्या राज्यांतून घेतल्या वस्तू – womens day pm...

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ( womens day ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( pm modi ) 'नारी शक्ती'ला सॅल्यूट केला आहे. भारताला स्वावलंबी...

Recent Comments