Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: राज्यातील ४० पोलिसांना करोना - karna to 3 policemen...

navi mumbai News: राज्यातील ४० पोलिसांना करोना – karna to 3 policemen in the state


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

करोनाशी डॉक्टरांप्रमाणे ऑनड्युटी राहून दोन हात करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांमध्ये या विषाणूची दहशत दिवसागणिक वाढत आहे. राज्यात करोनाबाधित पोलिसांची संख्या ४०वर पोहोचली असून ३०पेक्षा अधिक पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. मुंबईतही सुमारे १५ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. पोलिसांमुळे त्यांचे कुटुंबीय राहत असलेल्या वसाहतींमध्येही करोनाचा शिरकाव होत असल्याने अनेकांनी सद्यस्थितीत पोलिस ठाण्यातच थांबणे पसंत केले आहे.

देशभरात सध्या लॉकडाउन लागू असतानाही मुंबईसह राज्यातील अनेक भागात लोकांची गर्दी पाहायला मिळते. संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे असतानाही लोक ऐकत नसल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, वस्त्यांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. या कामाबरोबर घरात विलगीकरण करण्यात आलेल्यांवर नजर ठेवणे, रुग्णालयांना बंदोबस्त पुरविणे अशी कामे पोलिसांना करावी लागत आहेत. या दरम्यान नागरिकांशी संपर्क येत असल्याने पोलिसांनाही करोनाची लागण होत आहे. सुरुवातीला हा आकडा अगदी नगण्य होता, मात्र करोनारुग्णांच्या राज्यातील वाढत्या संख्येबरोबरच करोनाबाधित पोलिसांची संख्याही वाढत आहे. ४० पोलिसांना करोनाची लागण झाली असून यामध्ये ८ अधिकारी आणि ३२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या तितक्याच पोलिसांचे विलगीकरण करण्यात आल्यानेही पोलिस दलात चिंतेचे वातावरण आहे.

मुंबईत सुमारे १५ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. मध्य प्रादेशिक विभागात नेमणुकीला असलेल्या एका उपनिरीक्षकाला शनिवारी लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. खार, जुहू, बांगूरनगर, कुरार या पोलिस ठाण्यांतील तसेच संरक्षण आणि सुरक्षा विभागातील काही पोलिस याआधीच पॉझिटिव्ह आढळले आहेत. पोलिसांमुळे वरळी पोलिस कॅम्प, माहीम पोलिस वसाहत, बोरिवली योगी नगर, आर. ए. के. किडवाई मार्ग, भायखळा, नायगाव पोलिस कॉलनी या पोलिस कुटुंब राहत असलेल्या वसाहतींमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

घरपोच भाजीपाला

मुंबई पोलिस फाऊंडेशनच्या वतीने पोलिस आणि सरकारी वसाहतींमध्ये घरपोच भाजीपाला पोहचविण्यात येत आहे. काही संस्थांच्या मदतीने हा प्रयोग केला जात असून भाजीपालाही ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर माफक दरात विकला जात आहे. एका बॉक्सची किंमत ४०० रुपये असून यामध्ये कांदे, बटाटे, चार ते पाच भाज्या, मिरची, लिंबू, कोथिंबीर असे जिन्नस आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ऑस्ट्रेलियातून आलेल्या मुंबईतील खेळाडूंना आयुक्तांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडू आज गुरुवारी मायेदशात परतले. भारतीय संघातील खेलाडू त्यांच्या त्यांच्या शहरात दाखल झाले. पृथ्वी शॉ दिल्लीत, टी नटराजन...

bharat jadhav post for father: खूप रडलो होतो त्या दिवशी… अभिनेते भरत जाधव यांची भावुक पोस्ट – marathi actor bharat jadhav shares emotional post...

मुंबई: मराठी सिने-नाट्य सृष्टीत पहिली व्हॅनिटी घेणारा कलावंत म्हणून मान मिळविलेले अभिनेता भरत जाधव यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांसाठी एक भावुक अशी पोस्ट शेअर...

young woman murder in mhasrul nashik: म्हसरूळ शिवारात महिलेचा खून – 23 years old young woman murdered by unknown person in nashik

म. टा. वृत्तसेवा, पंचवटीम्हसरूळ शिवारातील पेठरोड परिसरातील पवार मळ्यानजिकच्या नाल्याजवळ महिलेचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) रात्री...

Recent Comments