Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : राज्यात दिवसभरात २,६०८ नवे रुग्ण - 2,608 new...

navi mumbai News : राज्यात दिवसभरात २,६०८ नवे रुग्ण – 2,608 new patients per day in the state


‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यात शनिवारी करोनाबाधित ६० रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील ४० रुग्णांचा समावेश आहे. मुंबईनंतर पुण्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून, सोलापुरात दोन, तर वसई-विरार, सातारा, ठाणे आणि नांदेड शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील करोना बळींची एकूण संख्या एक हजार ५७७ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासांतील असून, उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दिवसभरात राज्यात दोन हजार ६०८ करोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४७ हजार १९० इतकी झाली आहे. आज दिवसभरात राज्यात ८२१ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आजतागायत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे टोपे यांनी सांगितले. राज्यात सध्या २,३४५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून, शनिवारी एकूण १६ हजार ४१४ सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी ६५ लाख ९१ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

१,६६६ पोलिस कर्मचाऱ्यांना संसर्ग

मुंबईसह राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढतच चालल्याने पोलिस दल आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराटही वाढू लागली आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील करोनाबाधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या १,६६६ इतकी झाली असून, दोन दिवसांत राज्यभरात २८८ पोलिसांना संसर्ग झाला आहे.

बेस्टच्या १९० कर्मचाऱ्यांना करोना

मुंबई : बेस्ट उपक्रमातील कामगारांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण चिंताजनक ठरू लागले आहे. शनिवारी एकाच दिवसात बेस्टच्या १४ कामगारांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत करोनाग्रस्त कामगारांची एकूण संख्या १९० वर पोहोचली आहे. तर, करोनावर यशस्वी मात करणाऱ्यांची संख्या ९० झाली आहे. करोनाशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची एकूण संख्या आठ आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bill Gates: हे कसं घडलं? बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी! – bill gates became americas biggest farmer bought 242,000 acres land

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी झाले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिेकेतील १८ राज्यांमधील दोन लाख ४२ हजार एकर...

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले...

Recent Comments