Home शहरं मुंबई navi mumbai News : रुग्ण दुपटीचा वेग मुंबईत १९ दिवसांवर - patient...

navi mumbai News : रुग्ण दुपटीचा वेग मुंबईत १९ दिवसांवर – patient doubles in mumbai in 19 days


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग १९ दिवसांवर गेला आहे. तसेच कोविड योद्धा म्हणून डॉक्टर्स, परिचारिका पुढे येत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

करोना उपाययोजनांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी चर्चा झाली. याप्रसंगी पालिका आयुक्त चहल यांनी गेल्या काही दिवसांत मुंबईत खाटा व इतर साधन सामग्रीची कशी वाढ करण्यात आली आहे आणि यामुळे संक्रमण रोखण्यात आपल्याला कसे यश मिळत आहे याविषयी सांगितले. प्रत्येक खाटेला युनिक आयडी देणार, डायलिसीस रुग्णांना यापुढे उपचार मिळणार, प्रयोगशाळांना २४ तासांत चाचणी अहवाल देणे बंधनकारक करणार, असे सांगून आयुक्त चहल म्हणाले की, ३,७५० डॉक्टर उपचारांसाठी उतरत आहेत. ४५० डॉक्टर्सपैकी ६० जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मुंबईत सध्या २१ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधान सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. आजमितीस देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या ३५.२३ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. देशाच्या तुलनेत ३१.१९ टक्के रुग्ण सुधारण्याचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात मृत्यूदर ३.३७ टक्के असून देशाचा मृत्यूदर २.८२ टक्के आहे. जगात दर दहा लाख लोकांमागे ७७८ मृत्यू असताना महाराष्ट्रात हे प्रमाण ४८ इतके आहे. आज महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये मृत्यूदर ६.१८ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ५.६ टक्के, मध्य प्रदेशात ४.३२ टक्के इतका जास्त आहे. राज्यातील मृत्यूदर ७.५ टक्के होता तो कमी होऊन ३.३७ टक्के इतका खाली उतरला आहे. राज्यातील ३० ते ४० वयोगटात करोना लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४० टक्के, तर ४० ते ५० वयोगटात १८ टक्के आहे. ५० ते ६० वयोगटात ते १६.५ टक्के आहे. मृत्यू पावलेल्या ३२ टक्के रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. ६७ टक्के लोकांमध्ये इतर आजारही होते. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४१.३३ टक्के, तर ठाण्यात ३६.५९ टक्के आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४.५ लाख चाचण्या झाल्या आहेत. केवळ आंध्र आणि तमिळनाडू राज्यांत आपल्यापेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. पूर्वी राज्यात एकूण झालेल्या चाचण्यांपैकी १८ टक्के पॉझिटिव्ह आढळत होते. आता हे प्रमाण कमी होऊन १५.५ टक्के झाले आहे. सध्या राज्यात केवळ १,४०० रुग्ण गंभीर आहेत, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘करोना’शी लढताना पालिकांना आर्थिक चिंता – municipal corporation has need government fund to fight with coronavirus

औरंगाबाद: करोना संसर्गाशी दोन हात करताना महापालिकांना शासनाच्या निधीची गरज आहे, पण राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने निधी देताना हात आखडता घेतला आहे....

Maharashtra cabinet: केंद्राच्या ‘दूजाभावा’वर मंत्रिमंडळाची नाराजी – maharashtra cabinet upset on central government’s financial helps

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकार आर्थिक मदत करीत नसल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होत असल्याची तक्रार करीत, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा...

Recent Comments