Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: रेल्वे सुरक्षा अधिकारी, जवान करोनाग्रस्त - railway safety officer,...

navi mumbai News: रेल्वे सुरक्षा अधिकारी, जवान करोनाग्रस्त – railway safety officer, jawan coroner


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

लॉकडाउनच्या काळात गरजूंना जेवण देण्याच्या ड्युटीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच अन्य एक आरपीएफ जवानही करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांवर जगजीवन राम रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

करोनाची लागण झालेला अधिकारी पश्चिम रेल्वेवरील रेल्वे सुरक्षा बलाच्या मुंबई विभागात सहाय्यक सुरक्षा निरीक्षक पदावर कार्यरत आहे. लॉकडाउनच्या काळात गरजूंना जेवण वाटण्याची ड्युटी या अधिकाऱ्याला देण्यात आली होती. जेवणाची पाकिटे वाटत असताना करोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने या अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

या अधिकाऱ्याला वारंवार ताप येत होता. त्याने उपचारासाठी नायर रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील डॉक्टरांनी गोळ्या देत त्याला त्याला चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. अखेर रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात अधिकाऱ्याची चाचणी करण्यात आली आणि त्याला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले.

करोनाची लागण झालेल्या अन्य आरपीएफ जवानाला १४ एप्रिल रोजी सरकारी कामानिमित्त जगजीवन राम रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यावेळी त्याला करोनाचा संसर्ग झाला असावा, अशी शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Rahul Gandhi: राजस्थानमधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा होणार अध्यक्ष? – congress conclave may be held in rajasthan to reinstall rahul gandhi as congress...

नवी दिल्लीः नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी ( rahul gandhi ) यांच्या हाती जातील. राजस्थानमध्ये फेब्रुवारी...

Recent Comments