Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : वित्तीय केंद्र हलवणे अनावश्यक - moving the financial...

navi mumbai News : वित्तीय केंद्र हलवणे अनावश्यक – moving the financial center is unnecessary


म. टा. प्रतिनिधी, मुंबई’महाराष्ट्राचे अपार योगदान असूनही गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय अत्यंत वाईट, अयोग्य आणि अनावश्यक आहे. आर्थिक संस्था आणि व्यावसायिक घराण्यांना महाराष्ट्रातून दूर करण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न असल्याचे संकेत यामुळे जातील व त्यातून अनावश्यक राजकीय अस्थिरता निर्माण होईल,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरविचार करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.वित्तीय केंद्र गुजरातमध्ये स्थलांतरित केल्यामुळे देशाचे आर्थिक नुकसानच नाही तर मुंबईचे महत्त्व कमी झाल्यामुळे एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होईल, असे पवार यांचे म्हणणे आहे. गुजरातमध्ये हे केंद्र स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंतीही त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे.आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे प्राधिकरण देशातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी ‘युनिफाइड एजन्सी’ आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी वित्तीय प्राधिकरण गांधीनगरला हलवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest in france: Farmers protest फ्रान्समध्येही शेतकऱ्यांचा एल्गार, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी – french farmers protest against low earnings deplore high suicide...

हायलाइट्स:फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी सुपरमार्केट्स आणि वितरण केंद्राबाहेर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलनमागील वर्षी मंजूर झालेल्या कृषी कायद्यामुळेही दिलासा...

देशभक्ती आणि देशद्रोह

क्रांतिकारी किंवा नव-मानवतावादाचे जनक आणि ज्यांनी वैचारिक प्रवासाची नवनवी शिखरे जीवनात पादाक्रांत केली; त्या डॉ. मानवेंद्रनाथ रॉय यांनी राष्ट्रवादाविषयी महत्त्वाची मांडणी केली होती....

Indo Nepal border: नेपाळ पोलिसांकडून गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, एक बेपत्ता – indian national killed, one missing after police firing by nepal police

हायलाइट्स:सीमेवर नेपाळ पोलीस आणि तीन भारतीय नागरिकांत बाचाबाचीएका भारतीय नागरिकावर नेपाळ पोलिसांचा गोळीबारझटापटी दरम्यान सीमा पार करण्यात यशस्वी ठरल्यानं एकाचा जीव वाचलातिसरा साथीदार...

Recent Comments