Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : विधान परिषदेची राजू शेट्टींना ऑफर - legislative council's...

navi mumbai News : विधान परिषदेची राजू शेट्टींना ऑफर – legislative council’s offer to raju shetty


– राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेत आणण्याची पवारांची इच्छा

– स्वतंत्र शेतकरी संघटनेला वेसण घालण्याचा पाटील यांचा डाव

‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पश्चिम महाराष्ट्रातील आगामी राजकारणासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सेक्युलर विचारांच्या राजकारणासोबत कायम ठेवण्याचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर शेट्टी यांना दिली आहे. याबाबत शनिवारपर्यत अंतिम निर्णय घेण्याचे संकेत शेट्टी यांनी दिले आहेत.

राज्यपालनियुक्त राष्ट्रवादीच्या कोट्यातून माजी खा. राजू शेट्टी यांना आमदारकी देण्याचा शरद पवार यांच्या प्रस्तावाची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरी जाऊन मांडला. मागील फडणवीस सरकारमधील माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या स्वतंत्र शेतकरी संघटनेला वेसण घालण्याचा जयंत पाटील यांचा डाव आहे,असे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी माजी खा. राजू शेट्टी यांना शरद पवार यांनी शब्द दिला होता. मात्र,स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अद्याप कोणतेही पद मिळाले नाही. दोन्ही काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे दुर्लक्ष केले. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी स्वाभिमानीला एक जागा मिळावी याबाबत शेट्टी यांनी शरद पवार यांना मेल करून त्यांना अवगत केले होते. राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून शेट्टी यांनी विधान परिषदेत यावे, अशी शरद पवार यांची इच्छा आहे.

आगामी काळात शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर येणार असून, अशा काळात राजू शेट्टी यांच्यासारखा लढाऊ नेता महाविकास आघाडी सरकारसोबत असावा, असाही या ऑफरमार्ग तर्क असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. सध्याच्या घडीचे एकूणच राजकारण पाहता शेट्टी हे शरद पवार यांचा हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादीत बोलले जाते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai High Alert Get Input Of Terrorist Attack – मुंबईत हायअलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने माहिती...

Sambhaji Raje Slams Maha Vikas Aghadi Government Over Maratha Reservation – का खेळखंडोबा करता?; मराठा आरक्षणावरून संभाजीराजेंचा सरकारला सवाल

मुंबई: 'मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार समन्वयानं काहीही करताना दिसत नाही. मी अनेकदा सरकारला सूचना केल्यात. अशोक चव्हाण यांच्याशी बोलणं झालं आहे. पण...

rain in Nashik: ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार – nashik also received heavy rains in october month

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत १४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बागलाण तालुक्यात २८१ तर...

Recent Comments