शेताच्या भांडणावरुन देगलूर तालुक्यातील नरगंल येथे कुऱ्हाडी व कत्तीच्या सहाय्याने चुलत भावाचा शेतातच खून करण्यात आला रविवारी पहाटे ही घटना घडली…
Updated:
नांदेड : शेताच्या भांडणावरुन देगलूर तालुक्यातील नरगंल येथे कुऱ्हाडी व कत्तीच्या सहाय्याने चुलत भावाचा शेतातच खून करण्यात आला. रविवारी पहाटे ही घटना घडली.
नरगंल येथे कर्णे कुंटुबियात गेल्या अनेक वर्षांपासून शेताची भांडणे होती. रविवारी सकाळी गंगाधर ईरन्ना कर्णे (लहान) हा शेतात वखरणी करावयास गेला होता. शेताच्या शेजारीच रहात असलेले गंगाधर ईरन्ना कर्णे (मोठा), हणमन्लू ईरन्ना कर्णे, रेखाबाई हणमन्लू कर्णे व गंगाबाई ईरन्ना कर्णे यांनी गंगाधर कर्णे यास कुऱ्हाडी, कत्ती व काठीच्या सहाय्याने डोक्यावर, कपाळावर, पायावर, छातीवर व पाठीत मारून गंभीर जखमी केले. जखमीची पत्नी रेणुका गंगाधर कर्णे हिलाही मारहाण करण्यात आली. त्याच्या मुलास ही मारण्याची धमकी दिली. गंभीर जखमी झालेले गंगाधर कर्णे यास तातडीने देगलूर उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला.