Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : सरकार-राजभवनात दरी नाही - there is no gap...

navi mumbai News : सरकार-राजभवनात दरी नाही – there is no gap in the government-palace


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध मधुर आहेत. त्यांचे नाते पिता-पुत्राप्रमाणे आहे. सरकार आणि राजभवन यांच्यात कोणतीही दरी नाही, असे स्पष्ट करत शनिवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजवर राज्यपालांवर केलेल्या टीकेवर एकप्रकारे पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला.

राजभवन आणि आघाडी सरकार यांच्यातील संबंध अलीकडे ताणले गेले आहेत. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निर्णय न दिल्याने शिवसेनेत नाराजी होती. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशाप्रकारचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यात शुक्रवारीच विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आक्षेप घेतला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राऊत यांनी शनिवारी सकाळी राजभवनावावर राज्यपालांची भेट घेतली.

या भेटीनंतर बोलताना राऊत यांनी, राज्यपाल आणि सरकार यांच्यातील बेबनावाचा इन्कार केला. ‘आमच्यात दऱ्या वगैरे काही पडत नाहीत. विरोधक सतत येथे येत असतात. म्‍हणून विरोधी पक्षनेत्‍याचे दालन किंवा बंगला राजभवन परिसरात असावा, असे अनेकांनी सांगितले म्‍हणजे काही ती राज्‍यपालांवर टीका होत नाही. विरोधी पक्ष एका बेटावर आहे. त्‍यांना काही दिसत नाही. सरकार काय करते आहे याची संपूर्ण माहिती सरकार राज्‍यपालांना देत असते. त्‍यांना पूर्ण माहिती आहे,’ असेही राऊत यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भाने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविलेल्‍या पत्राबद्दल राज्‍यपालांनी आक्षेप घेतला आहे. याकडे लक्ष वेधले असता, उदय सामंत यांनी त्‍यांचे मत व्यक्‍त केले आहे. अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्‍यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतात. त्‍यांनी आपली भूमिका व्यक्‍त केली. आता त्‍यानुसार सरकार आणि मंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

‘राज्‍यपाल हे राज्‍याचे पालक आहेत.घटनात्‍मक प्रमुख आहेत. आमचे मार्गदर्शक आहेत. मी खूप दिवस त्‍यांना भेटलो नव्हतो, म्‍हणून आजची ही सदिच्छा भेट होती. यापलीकडे काही नाही.’

संजय राऊत

नेते, शिवसेनाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments