Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : हापूसला कर्नाटक आंब्याचा फटका - hapus hit by...

navi mumbai News : हापूसला कर्नाटक आंब्याचा फटका – hapus hit by karnataka mango


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हापूसची चांगली आवक होत आहे, परंतु त्याचबरोबर बाजारात कर्नाटकमधील आंब्याचीही चांगली आवक होऊ लागल्याने त्याचा फटका हापूसला बसायला सुरुवात झाली आहे. हापूससारखाच दिसणारा, पण तुलनेने कमी दरात मिळणारा हा आंबा खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. त्यामुळे हापूसची मागणी कमी झाली असून दरातही काही प्रमाणात घसरण झाली आहे.

कोकणातील हापूस आंब्याची चव, आंब्याचा गोडवा पाहता या फळांच्या राजाला नेहमीच मोठी मागणी राहिली आहे. त्यामुळे या हापूस आंब्याचे दर कायम अधिक असतात. याचाच फायदा दरवेळी कर्नाटकच्या आंब्याला मिळत आला आहे. हा आंबा दिसायला हापूससारखाच असल्याने त्यातील फरक चटकन लक्षात येत नाही. याचा गैरफायदा घेऊन अनेक व्यापारी कर्नाटकचा आंबा कोकणातील हापूस आंब्याच्या नावे विकतात. कोकणातील हापूस आंबा ३०० ते ६०० रुपये डझनने विकला जातो. कर्नाटकमधील आंबा आकारानुसार ३० ते ८० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. त्यामुळे नफा कमावण्यासाठी अनेक व्यापारी कर्नाटकचा आंबा हापूस असल्याचेच भासवून विकत आहेत. याला अनेक ग्राहक बळी पडतात. परिणामी कोकणातील हापूस आंब्याची मागणी कमी झाली आहे, अशी माहिती आंबा विक्रेते विजय बेंडे यांनी दिली.

त्यामुळे हापूसच्या दरातही काही प्रमाणात घसरण झाली आहे. ३०० रुपये डझन असलेला हापूस आता २०० रुपये डझनवर आला आहे. याचा फटका कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या महिन्यापर्यंत करोना प्रादुर्भावामुळे लॉकडाउन असल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. आंबा बाजारात पोहचवणे अत्यंत कठीण झाले होते. आता आंबा बाजारात येत आहे, मात्र त्याला कर्नाटकी आंब्याचा फटका सहन करावा लागत आहे.

१०० गाड्या हापूसच्या

घाऊक फळ बाजारात दररोज ४५० ते ४७० गाड्यांची आवक होत आहे. त्यात १०० गाड्या हापूस आंब्याच्या असतात. ४० ते ५० गाड्या कर्नाटक आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या आंब्याच्या असतात. कर्नाटकचा आंबा मोठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक ठिकाणी तोच कोकणातील आंबा म्हणून विकला जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments