Home मनोरंजन Nawazuddin Siddiqui: ईद साजरी करण्यासाठी नवाजुद्दीन पोहोचला गावी; १४ दिवसांसाठी केलं क्वारंटाइन...

Nawazuddin Siddiqui: ईद साजरी करण्यासाठी नवाजुद्दीन पोहोचला गावी; १४ दिवसांसाठी केलं क्वारंटाइन – nawazuddin siddiqui reach hometown muzaffarnagar to celebrate eid


मुंबईः मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. करोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं ईद घरीच साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील घरच्यांसोबत ईदचा सण साजरा करण्यासाठी त्यांच्या गावी पोहचला आहे. गावी पोहचल्यानंतर त्याला पूर्ण कुटुंबासह १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन त्याच्या कटुंबासह मुंबईहून मुजफ्फरनगर येथील त्याच्या घरी पोहचला आहे. गावी जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर तो त्याच्या खासगी वाहनानं बुधाना पोहचला. त्यानंतर जवळपास १४ दिवसांसाठी त्यानं सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. २५मे पर्यंत नवाजुद्दीन इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीये. गावी पोहचल्यानंतर नवाजुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबाची कोव्हिड टेस्टही करण्यात आली होती. या टेस्टचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

वाचाः लॉकडाउनमध्ये शुटिंग बंद; कलाकारांच्या मानधनात कपात

दरम्यान, दक्षिण दिल्लीतील मरकजच्या मुद्द्यावर नवाजुद्दिन भडकला होता. एका खासगी वाहिनीवर बोलताना त्याचं मत मांडलं होतं. ‘जर सरकारने लॉकडाउन सांगितलं आहे तर त्याचा अर्थ आहे पूर्ण लॉकडाउन. तुम्ही कोण आहात आणि कोणत्या धर्माचे आहात याचा इथे काहीही संबंध येत नाही. असं केलं नाही तर फक्त तुम्ही तुमचंच नाही तर इतरांचं आयुष्यही धोक्यात घालत आहात’ अ्सं म्हणतं त्यानं संताप व्यक्त केला होता.

वाचाः ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानावर चित्रपट येणारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

रिया चक्रवर्ती: वांद्र्यात फुलं विकत घेताना दिसली रिया चक्रवर्ती, यूझर म्हणाले- ‘सुशांतच्या वाढदिवसाचा ड्रामा सुरू झाला’ – rhea chakraborty requested to not follow her

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बर्‍याच आरोपांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ती वांद्रे येथे सर्वसामान्यांप्रमाणे...

jalgaon district: ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा; ५ जणांची कारागृहात रवानगी – collector take action against gram sevaks in jalgaon district

म. टा. प्रतिनिधी, जळगावः पदभार सोडूनही ग्रामपंचायतीचे दप्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ८ ग्रामसेवकांना ही दप्तर दिरंगाई चांगलीच महागात पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी...

Recent Comments