पोस्ट, अर्जासह या रिक्त पदांचा तपशील या पुढे देण्यात आला आहे. यासह एनसीईआरटीने जारी केलेल्या अधिसूचनांच्या तसेच अर्जांच्या आवश्यक लिंकही देण्यात येत आहेत.
पदांची माहिती
प्राध्यापक – ३८ पदे
असोसिएट प्रोफेसर – ८३ पदे
सहाय्यक प्राध्यापक – १४२ पदे
ग्रंथपाल – १ पद
सहाय्यक ग्रंथपाल – २ पदे
एकूण पदांची संख्या – २६६
ही पदे बदलीयोग्य आहेत. म्हणजेच ज्यांची निवड केली जाईल त्यांना आवश्यकतेनुसार अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलाँग आणि नवी दिल्ली येथील एनसीईआरटी कार्यालयात नेमणूक दिली जाऊ शकते.
अर्जांची माहिती
एनसीईआरटीची अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. २९ जून २०२० पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणी आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ ऑगस्ट २०२० (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) आहे. अर्जाची लिंक पुढे देण्यात आली आहे.
सर्वसाधारण, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना अर्जासाठी १००० रुपये फी भरावी लागेल. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
आवश्यक पात्रता
शैक्षणिक पात्रता आणि वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा देखील स्वतंत्रपणे विहित आहेत. या सूचनेवरून सविस्तर माहिती मिळू शकते.
वेतन
प्राध्यापक- स्तरावरील
प्रवेश वेतन १,४४,२०० रुपये दरमहा
असोसिएट प्रोफेसर – लेवल १२ ए अंतर्गत वेतन १,३१,४०० दरमहा
सहाय्यक प्राध्यापक: लेव्हल १० अंतर्गत वेतन ५७,७०० रुपये दरमहा
सहाय्यक लायब्ररीयन -दरमहा १,४४२०० रुपये वेतन
असिस्टंट लायब्ररीयन – -दरमहा ५७,७०० रुये वेतन
एनसीईआरटी जॉब अधिसूचना 2020 साठी येथे क्लिक करा.
या रिक्त स्थानासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
एनसीईआरटी वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.