Home महाराष्ट्र ncp anniversary: करोना संकटात राष्ट्रवादीचा वर्धापनदिन ठरणार अविस्मरणीय! - blood donation camps...

ncp anniversary: करोना संकटात राष्ट्रवादीचा वर्धापनदिन ठरणार अविस्मरणीय! – blood donation camps should be organized all over the state: ncp


मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून हा वर्धापनदिन दरवर्षी उत्साहाने साजरा होत असला तरी करोना संकटामुळे यंदा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे राज्यभर आयोजन करण्यात यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.

करोना संकटामुळे पक्षाचा २१ वा वर्धापनदिन सार्वजनिकरित्या व मोठ्या प्रमाणावर साजरा करता येत नसला तरी वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण, रुग्णालयांची रक्ताची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पक्षकार्यकर्त्यांनी स्वयंसेवी संस्था, नागरिकांच्या सहकार्याने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

करोना रुग्णांना तितकीशी रक्ताची गरज पडत नाही परंतु, राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसेमिया व अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी पुढे यावे, स्वत: रक्तदान करावे व इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे. रक्तसंकलनाच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

राज्यावरील करोनाचे संकट आणि गेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे केलेल्या जनसेवेबद्दल या जयंत पाटील व अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले असून आभार मानले आहेत. समाजातील दुर्बल, वंचित घटकांना, तसेच अडचणीत असलेल्या बांधवांना पक्षीय व वैयक्तिक पातळीवर मदत करण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असे या दोन्ही नेत्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली २० वर्षे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि सर्वसमावेश विकासाच्या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून काम करत आहे. मागासवर्गीय, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पक्ष लढत आहे. पक्षाचे पुरोगामी, प्रगतशील विचार, पक्षाची ध्येय-धोरणे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अधिकाधिक युवकांनी, युवतींनी, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी स्वत:ला जोडून घ्यावे. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यानिमित्ताने दोन्ही नेत्यांनी केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shiv sena attacks bjp: ‘त्या ठेकेदारांचे दात सरसंघचालकांनी घशात घातले’ – shiv sena lashes out at bjp over hindutva in saamana editorial

मुंबई: 'हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी आहे. जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विकृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले आहेत. पण, सरसंघचालकांनी नागपुरातील...

health minster rajesh tope: चाचण्यांसाठी पुन्हा दरकपात – maharashtra goverment again reduced price of corona test

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्यात करोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली...

Lasalgaon onion market: मुंबई बाजारात कांद्याची आवक घटली – onion imports declined in mumbai due to onion auction close in lasalgaon onion market

म. टा. वृत्तसेव, नवी मुंबईकांद्याची मर्यादेपेक्षा अधिक साठवणूक करणाऱ्या साठेबाजांवर धाडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर, कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये लिलाव बंद पडले आहेत....

Recent Comments