Home आपलं जग करियर neet 2020: नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; आरोग्य मंत्रालयाला पत्र - neet...

neet 2020: नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; आरोग्य मंत्रालयाला पत्र – neet 2020 parents association demands to postpone neet exam


देशातील करोनाव्हायरसच्या चिंताजनक परिस्थितीमुळे सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. CTET 2020 ची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. आता NEET आणि जेईई मेनची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. पॅरेंट असोसिएशन ऑफ इंडियाने यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाला एक पत्र लिहिले आहे. NEET 2020 पुढे ढकलण्यासाठी असोसिएशनने १६ मुद्द्यांची यादी केली आहे. २६ जुलै रोजी ही परीक्षा होणार असून यामध्ये सुमारे १६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

पेरेंट्स असोसिएशन ऑफ इंडियाने लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की करोनाव्हायरसचे स्वरूप पाहता याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या जीवनावरच होणार नाही तर संपूर्ण देशाच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवरही परिणाम होईल. देशातील इतर पालक संघटनांनीही या परीक्षेला विरोध दर्शविला आहे.

नीट २०२० परीक्षा यापूर्वीही स्थगित

नीट २०२० परीक्षा याआधीर ३ मे २०२० रोजी ठेवण्यात आली होती. करोनाव्हायरस संसर्ग रोखण्यासाठी घेतलेल्या लॉकडाऊनमुळे इतर परीक्षांसह नीटची ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. मे च्या अखेरीस परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. परंतु करोनाव्हायरस संसर्गाच्या स्थितीत सुधारणा होत नसल्याने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.

‘असे’ होतात भारतातील टॉप १० विद्यापीठांचे प्रवेश

कोट्यवधी विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, टीव्ही? केंद्राचा प्रस्ताव

सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षा रद्द

ईशान्य दिल्लीतील दंगलीचा त्या भागातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर परिणाम झाला होता. बारावीच्या उर्वरित परीक्षा लॉकडाऊन देशभरात स्थगित करण्यात आल्या. दहावीची परीक्षा ईशान्य दिल्लीत होणार होती तरcबारावीच्या उर्वरित परीक्षा देशभर घेण्यात येणार होत्या. सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या या उर्वरित विषयांच्या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० या कालावधीत घेण्यात येणार होत्या, पण या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचा निकाल एका विशिष्ट फॉर्म्युलाच्या आधारे तयार केला जाईल. आयसीएसई बोर्डानेही परीक्षा रद्द केली आहे. ५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET 2020 परीक्षा होणार होती. सीबीएसईने ही परीक्षा स्थगित केल्याची नोटीसही बजावली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मराठवाड्याची रुग्णसंख्या पाचशेच्या खाली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. विभागात सोमवारी (२६ ऑक्टोबर) ४३३ नवीन बाधित आढळले. विविध रुग्णालया...

fine to covid norms beaker: ७१ दोषींना ३८ हजारांचा दंड – nashik district court recovered 38000 rupees fine from who break covid 19 norms

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकलॉकडाऊन काळातील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ७१ दोषी नागरिकांना सोमवारी (दि. २६) कोर्टाने शिक्षा ठोठावली. या नागरिकांकडून ३८ हजार रुपयांचा...

WhatsApp: व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याने ‘त्यांनी’ केला अॅडमिनवर हल्ला – whatsapp group admin attacked by two men after removing member

नागपूर : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने अॅडमिनवर हल्ला करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंद्रमणी यादव (५०, सिंधी कॉलनी, वैशालीनगर) आणि छत्रपती...

Recent Comments