Home देश Nepal police firing: नेपाळ पोलिसांचा सीमेवर गोळीबार, एक भारतीय ठार तर दोन...

Nepal police firing: नेपाळ पोलिसांचा सीमेवर गोळीबार, एक भारतीय ठार तर दोन जखमी – one indian died and two injured in indiscriminate firing by nepal police in sitamarhi bihar


सीतामढीः भारत-नेपाळमध्ये सीमेवरून वाद सुरू (India Nepal Border Dispute) असताना बिहारच्या सीतामढीमध्ये मोठी घटना घडल्याचे वृत्त आहे. सीमेवर नेपाळ पोलिसांकडून (Nepal Police Firing) तुफान गोळीबार केलाय. या गोळीबारात शेतात काम करणाऱ्या एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. या घटनेनंतर सीमेवर तणाव आहे.
नेपाळ पोलिसांचा बेछुट गोळीबार

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील नायरायणपूर आणि लालबंदी येथील नेपाळ सीमाभागात हा प्रकार घडलाय. पिपरा परसाइन पंचायतीच्या जानकी नगर भागात काही कामगार शेतात काम करत होते. यावेळी नेपाळ पोलिसांनी त्यांच्या बेछुट गोळीबार केला. यात लालबंदीचे रहिवासी नागेश्वर राय यांच्या २५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. नेपाळ पोलिसांकडून जाणूनबुजून हा गोळीबार केला गेला, असा गवकऱ्यांचा आरोप आहे. भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महानिरीक्षकांनी या नेपाळ पोलिसांच्या गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

गोळीबारात एक ठार, दोन गंभीर जखमी

नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात एकाच्या उजव्या हाताच्या काखेत गोळी लागलीय. तर दुसऱ्या तरुणाच्या कंबरेत गोळी लागलीय. दोन्ही जखमींना सीतामढी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. सीमेवर दोन्ही देशाचे पोलीस तैनात आहेत. या घटनेने सीमेवर तणावाचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झालेत.

सीमेवर पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, भारतीय लष्कराचा दणका

भारत-नेपाळ सीमावादा दरम्यान गोळीबार

नेपाळने जारी केलेल्या नव्या नकाशावरून दोन्ही देशात वाद निर्माण झाला आहे. नेपाळने भारतातील बराचसा भूभाग आपल्या नवीन नकाशात दाखवला आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिपिंयाधुरा हे भाग आपले आहेत, असा नेपाळचा दावा आहे. नेपाळच्या या निर्णयाने भारतासोबतचे संबंध बिघडले आहेत. आपली अखंडता आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही, असं भारताने स्पष्ट केलं आहे. तसंच सीमावादाचा मुद्दा चर्चेद्वारे सोडवता येईल, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

hyderabad rain: ‘हैदराबादमध्ये १०० वर्षांत असा पाऊस पडला नाही’, CM नी केली ‘ही’ मोठी घोषणा – hyderabad had not experienced such heavy rainfall in...

हैदराबादः महाराष्ट्रसोबत तेलंगणमध्ये ( hyderabad rain ) पावसाने प्रचंड नुकसान झाले. महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना अद्याप राज्य सरकारकडून कुठलीही मदत घोषित करण्यात...

Nawab Malik: कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होते!; फडणवीसांवर राष्ट्रवादीने डागली तोफ – ncp leader nawab malik targets devendra fadnavis

मुंबई: 'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी...

Recent Comments