Home मनोरंजन nepotism in music industry: सिनेसंगीत क्षेत्रातही घराणेशाहीचा 'राग' - singers open up...

nepotism in music industry: सिनेसंगीत क्षेत्रातही घराणेशाहीचा ‘राग’ – singers open up on nepotism in music industry


मुंबई :अभिनय क्षेत्रात नवोदित कलाकारांना चटकन न मिळणारी संधी, बड्या कलाकारांचे स्टारपुत्र, स्टारकन्या यांचे होणारे लाड यावरुन बॉलिवूड सध्या व्यक्त होत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सिनेसंगीत क्षेत्रातही काही वेगळी परिस्थिती नसल्याचं सांगत गायक सोनू निगम यानंही या वादात उडी घेतली आहे. ही कंपूशाही सिनेसंगीत क्षेत्रातही भिनली असल्याचं तो म्हणतोय. ‘म्युझिक माफिया’ असं नाव देऊन त्यानं केलेले आरोप इंडस्ट्रीत चर्चेचा विषय बनले आहेत. त्याच्या या आरोपांमुळे संगीतविश्वातील काही बड्या नावांचे धाबे दणाणले असल्याचं कळतंय. काही गायक-गायिका त्याच्या सुरात सूर मिसळून व्यक्त होत आहेत.

सोनू पहिल्यांदाच सिनेसंगीतातील राजकारणावर व्यक्त झालाय असं नाहीय. यापूर्वीदेखील त्यानं स्वत:वर होणाऱ्या अन्यायाविषयी माध्यमांशी संवाद साधला होता. सिनेसंगीताच्या क्षेत्रातही गटबाजी चालते आणि त्यामुळे अनेक तरुण आणि नवोदित गायक, संगीतकारांना इथे जम बसवण्यात अडचणी येतात, असं एका मुलाखतीत सोनू निगमनं सांगितलं होतं. तो म्हणाला, की, ‘संगीतकार अमित त्रिवेदीनं मला ‘शानदार’च्या ‘गुलाबो’ गाण्यासाठी बोलावलं होतं. पण, अचानक मला सांगण्यात आलं की, माझा आवाज गाण्याला शोभत नाहीय. आणि मला सिनेमातून वगळण्यात आलं.’ ‘दिल्ली की सर्दी’सारखं सुपरहिट गाणं देणारी गायिका श्वेता शेट्टीदेखील सोनू निगमच्या व्यक्त होण्यानंतर पुढे आली आहे. ती म्हणाली, ‘जेव्हा मी माझ्या संगीत कारकीर्दीत यशाची चव चाखत होते, तेव्हा माझ्यावर अनेकांनी बंदी आणली. मला काळ्या यादीत टाकण्यात आलं. मीसुद्धा त्यावेळी सुशांतसिंह राजपूतच्या वयाची होते.’ गायिका मोनाली ठाकूर हिनं देखील सोनू निगमच्या सुरात सूर मिसळला आहे.

रिअॅलिटी शोमधून आलोय; म्हणून..
‘गेरुआ’ आणि ‘साडी के फॉल सा’फेम गायक अंतरा मितरानं सोनू निगमच्या वक्तव्याला सहमती दर्शवली. ती म्हणाली, ‘हो, संगीत जगतात ही म्युझिक माफियांचं वर्चस्व आहे. गटबाजी, नेपोटिझम तसेच निवडक जणांचीच मक्तेदारी इकडे आहे. त्यामुळे अनेक प्रतिभावान कलाकार पुढे येत नाहीत; किंवा त्यांना पुढे आणलं जात नाही. सोबतच आमच्यासारख्या रिअॅलिटी शोमधून आलेल्या गायकांना जाणीवपूर्वक काम दिलं जात नाही. ‘इंडियन आयडॉल २’नंतर मलाही हा अनुभव आला.

गाणं तर गायलं, पण…
‘तुनूक तुनूक’ आणि ‘रंग दे बसंती’सारखी अनेक सुपरहिट गाणी गाणारे गायक दलेर मेहंदी यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘झूम बराबर झूम’ चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शकांनी माझ्याकडून गाणं गाऊन घेतलं. शंकर-एहसान-लॉय यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं. सर्वांना हे गाणं आवडलं. नंतर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्यात माझं नाव किंवा गाणं नव्हतं. त्या घटनेमुळे मला मोठा धक्का बसला आणि मला बॉलिवूडपासून दूर जायला भाग पाडलं गेलं.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Uttar Pradesh: बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम; गर्लफ्रेंडला घेऊन प्रिन्स झाला पसार – uttar pradesh love affair man absconded with sister friend in ghazipur

गाझीपूर: उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एका तरुणाचे बहिणीच्या मैत्रिणीवर प्रेम जडले. त्याने बहिणीच्या मदतीने तिला पळवून नेले. मुलीच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून,...

Eknath Khadse Resignation: फडणवीसांची बदनामी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून खडसेंचा वापर: भाजप – pravin darekar attacks on ncp over eknath khadse resignation

साताराः 'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कुशलपणे पाच वर्षे राज्याचा कारभार चालवला याचा पोटशूळ काहींना उठला आहे. यामुळे एकनाथ खडसे यांचा गेम...

Coronavirus Second Wave: Coronavirus updates करोनाची दुसरी लाट; युरोपमध्ये सात दिवसात सव्वानऊ लाख बाधित – coronavirus second wave numbers of infected people rising in...

जिनिव्हा : युरोपात आठवडाभरात ९ लाख २७ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले असून, युरोपातील आठवड्याच्या रुग्णसंख्येने गेल्या आठवड्यात उच्चांक गाठला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने...

Recent Comments