Home ताज्या बातम्या Network18 Poll: चीनी वस्तूंवर बहिष्काराची 70 टक्के लोकांची तयारी, 92 टक्के म्हणतात...

Network18 Poll: चीनी वस्तूंवर बहिष्काराची 70 टक्के लोकांची तयारी, 92 टक्के म्हणतात चीनच खरा शत्रू, network18-polls-show-70-of-indians-willing-to-boycott-chinese-goods-amid recent border-tension mhak | National


भारतीय सेलिब्रेटिजनी चीनी उत्पादनांच्या जाहीराती करू नये असं मत 97 टक्के लोकांनी व्यक्त केलं. तर 43 टक्के लोकांनी चायनीज फूडवर बहिष्कार घालणार असल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली 20 जून: गलवान खोऱ्यात चीनी सैन्याने जो क्रूर खेळ केला त्यामुळे सर्व देशात संतापाची तीव्र भावना आहे. चीनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे चीनबद्दल देशात प्रचंड असंतोष निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर Network18 ने एक देशव्यापी सर्व्हे केला. त्यात जनमताचा कौल स्पष्ट झाला असून 70 टक्के लोकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची तयारी दाखवली. तर पाकिस्तान नाही तर चीनच भारताचा खरा शत्रू आहे असं तब्बल 92 टक्के लोकांना वाटतं.

Network18 ने आपल्या सर्व वेबसाईट्स आणि सोशल मीडियावर हा सर्व्हे घेतला. त्यात ‘News18 लोकमत’सह सर्व भाषिक वेबसाईट्स, CNN-News18, News18 India, CNBC-TV18, Moneycontrol आणि Firstpost सहभागी झाले होते.

चीनी Apps आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बहिष्कार घालण्याची आणि त्यासाठी इतरांना प्रेरित करण्याची तयारी 91 टक्के लोकांनी दाखवली. 70 टक्के लोकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची तयारी दाखवली त्यासाठी जास्त किंमत देण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले. तर चीनवर विश्वास नसल्याचं 92 टक्के लोकांनी सांगितलं.

मोदींचा Yoga Day यावर्षी डिजिटल; सोशल मीडियावर अवतरले नवे इमोजी

भारतीय सेलिब्रेटिजनी चीनी उत्पादनांच्या जाहीराती करू नये असं मत 97 टक्के लोकांनी व्यक्त केलं. भारताच्या मदतीला धावून येणारा कुठलाही देश नाही. भारताला आपली लढाई स्वत:च लढावी लागेल असं 52 टक्के लोकांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे जवळचे मित्र आहेत असं 18.12 तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे जवळचे मित्र आहेत असं 19.32 टक्के लोकांना वाटतं.

सुशांत तु घाई का केलीस? बिहारच्या IPS अधिकाऱ्याची काळजाला भिडणारी पोस्ट!

43 टक्के लोकांनी चायनीज फूडवर बहिष्कार घालणार असल्याचं सांगितलं. तर 31टक्के लोकांना वाटतं की या वादाशी अन्नाचा काही संबंध नाही.

या सर्व्हेमध्ये लोकांना 9 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात 6 हजार जणांनी आपलं मत नोंदवलं.

First Published: Jun 20, 2020 11:25 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

economy in trouble if corona surge: करोनाची दुसरी लाट, महागाईचा भडका; रिझर्व्ह बँक म्हणते अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात – inflation and corona second wave will...

नवी दिल्ली : मागील दोन महिन्यात अर्थव्यवस्थेने पुन्हा सावरण्यास सुरुवात केली होती. मात्र पुन्हा एकदा करोना रुग्णवाढीचा आलेख वरच्या दिशेने झेपावू लागला आहे....

woman suicide due to harassment: छळाला कंटाळून विवाहितांच्या आत्महत्या – nashik woman suicide case, married woman suicide due to harassment in nashik

म. टा. प्रतिनिधी, नाशिकमानसिक व शारीरिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या दोन घटना समोर आल्या असून, या प्रकरणी संबंधित सासरच्या मंडळीविरोधात हुंडाबळीचे...

Ajinkya Rahane: KKR vs DC: पृथ्वी शॉला बाहेर बसवले, मुंबईच्या या खेळाडूला दिली संधी – dc vs kkr delhi capitals ajinkya rahane comes in...

दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज शनिवारी कोलकाता नाइड रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी लढत होत आहे. दिल्लीचा संघ गुणतक्त्यात १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर...

Recent Comments