Home विदेश new zealand eleciton: न्यूझीलंडमध्ये मजूर पक्षाची विजयाकडे वाटचाल; जेसिंडा अर्डन पुन्हा पंतप्रधानपदी!...

new zealand eleciton: न्यूझीलंडमध्ये मजूर पक्षाची विजयाकडे वाटचाल; जेसिंडा अर्डन पुन्हा पंतप्रधानपदी! – jacinda ardern’s labour party set for victory in new zealand election


वेलिंग्टन: न्यूझीलंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्ष आता दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास टाकला असून मोठ्या विजयाकडे मजूर पक्षाने वाटचाल सुरू केली आहे. करोनाच्या संसर्गावर प्रभावीपणे मात केल्याबद्दल जेसिंडा अर्डन यांचे जगभरात कौतुक करण्यात येत होते. करोना काळात सरकारने केलेल्या कामगिरीचा त्यांच्या यशात मोठा वाटा असल्याचे जाणकार सांगतात.

न्यूझीलंडमध्ये जवळपास ९० टक्के मतमोजणी पार पडली आहे. यामध्ये सत्ताधारी मजूर पक्षाला ४९ टक्के मते मिळाली आहेत. तर, विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल पार्टीला २७ टक्के मते मिळाली आहेत. मतांनुसार, मजूर पक्षाकडे १२० पैकी ६४ जागा जाणार असल्याचा अंदाज आहे. तर, विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल पार्टीला ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. मजूर पक्षाचा हा मागील ५० वर्षात सर्वात मोठा विजय आहे.

वाचा: वेल डन! ‘या’ देशाचा दुसऱ्यांदा करोनावर विजय

विरोधी पक्ष नेत्या जुडीथ कॉलिन्स यांनी या विजयाबद्दल पंतप्रधान जेसिंडा अर्डन आणि मजूर पक्षाचे अभिनंदन केले आहे. तर, या शानदार विजयाबद्दल जेसिंडा अर्डन यांनी मतदारांचे आभार मानले आहे. या निवडणुकीमुळे लोकांमध्ये फूट पडली नाही. आमचं सरकार अधिक सकारात्मक पद्धतीने काम करणार असल्याचे अर्डन यांनी सांगितले. न्यूझीलंडच्या जनतेने दाखवलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्यावर विश्वास व्यक्त केला. त्याबद्दल आभारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वाचा: इम्रान खान यांचा काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न; विरोधकांचा आरोप

वाचा: हो शक्य आहे! न्यूझीलंडने ‘असे’ केले करोनाला हद्दपार

मजूर पक्षासाठी हे निकाल ऐतिहासिक आहेत. मजूर पक्षाला आता बहुमतासाठी इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही. मागील कार्यकाळात दोन लहान पक्षांचा पाठिंबा घेऊन अर्डन यांनी सरकार चालवले. तीन वर्षांपूर्वी जेसिंडा अर्डन यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली होती. त्यावेळी अनेकांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र, करोना काळातील परिस्थिती हाताळण्यात न्यूझीलंड सरकारला यश मिळाले. न्यूझीलंड हा सध्या करोनामुक्त देश आहे. काही देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असताना न्यूझीलंडने दुसरी लाटही थोपवून धरली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: जिल्ह्यात ५०२ रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू – nagpur reported 502 new corona cases and 11 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गेल्या सात महिन्यांपासून करोनाने जिल्ह्यात घातलेले थैमान आता कुठे उतरणीला लागत असल्याची आशा काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या घटत्या संख्यावारीमुळे...

Imrati Devi Used Word Item For Kamal nath Mother And Sister, Video Goes Viral – कमलनाथांच्या आई-बहिणीला ‘आयटम’ म्हणणाऱ्या इमरती देवी व्हायरल

भोपाळ : काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका महिलेसाठी 'आयटम' हा शब्द वापरल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. मध्य प्रदेशातही या...

Recent Comments