Home मनोरंजन nilesh sable lovestory: हॅपी बर्थडे: निलेश साबळेची फिल्मी लव्हस्टोरी - happy birtday...

nilesh sable lovestory: हॅपी बर्थडे: निलेश साबळेची फिल्मी लव्हस्टोरी – happy birtday chala hawa yeu dya fame dr nilesh sable and his wife lovestory


मुंबई: ‘कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसलंच पाहिजे, असे म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक म्हणजे डॉ. निलेश साबळे. लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ची गेल्या काही वर्षांपासून एकहाती सूत्रे सांभाळणारा हा अवलिया कलावंत. केवळ निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व जबाबदाऱ्या लिलया पेलणाऱ्या या बहुगुणी कलाकाराचा आज वाढदिवस. दर आठवड्याला थुकरटवाडीचे हे कलाकार येतात आणि प्रेक्षकांना खळखळून हसवतात. हा सिलसिला गेल्या अनेक वर्षांपासून अखंड सुरु आहे. मुंबईतील स्टुडिओत चित्रीत होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्र दौऱ्यानिमित्तानं विविध शहरांमध्ये गेला आणि गावागावांतील प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वीही ठरला.

निलेश डॉक्टर आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. या प्रवासात त्याला साथ मिळाली ती त्याच्या कुटुंबियांची. त्याची पत्नी त्याच्यासोबत होती. गौरी तिचं नाव. आयुर्वेदाची एम. एस ही पदवी घेतल्यानंतर निलेशनं ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
त्यानं ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची आणि सुत्रसंचलनाची धुरा सांभाळत असताना त्यानं कधी मागे वळून पाहिलं नाही.
सोशल मीडिया दिन: स्वप्निल जोशी तुम्हाला देणार बर्थडेच्या शुभेच्छा…पण ‘या’ अटीवर
निलेश आणि गौरी एका कॉलेजमध्ये नसतानाही त्यांची ओळख झाली. निलेश एका कार्यक्रमानिमित्त गौरीच्या कॉलेजमध्ये गेला असता तिथं गौरीसोबत त्याची ओळख झाली. त्यानंतर दोघं एकमेकांचे चांगले मित्र बनले, नंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मला डॉक्टरकी करण्यात काही रस नाही असं निलेशनं गौरीला तेव्हाच सांगून टाकलं होतं. तू काहीही केलं तर माझी तुला साथ असेल असं गौरीनं त्याला सांगितलं. त्यामुळं या दोघांचा हा प्रवास इथवर यशस्वी होऊ शकला. सध्या गौरी देखील निलेशला त्याच्या शोच्या कामांमध्ये मदत करताना दिसते.
कोट्यधीश होऊनही शेवटपर्यंत वडिलांची एक इच्छा पूर्ण करू शकला नाही सुशांत
‘ते’ स्वप्न पूर्ण
काही दिवसांपूर्वी निलेशचा मित्र आणि अभिनेता कुशल बद्रिके यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निलेशनं मुंबईत घर घेतल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.’काही वर्षांपुर्वी पनवेलच्या बस स्टॉपवर रात्र काढणाऱ्या मित्राला त्याच्या मुंबईल्या स्वत:च्या घरासाठी खूप खूप शुभेच्छा .Dr.तुझं अभिनंदन . आणी जिच्याशिवाय हे शक्य झालं नसतं त्या गौरीच खरं कौतुक’, अशा गोड शुभेच्छा कुशलनं निलेशला दिल्या होत्या. कुशलनं लिहिलेल्या पोस्टवरून निलेशचा हा प्रवास सहज सोपा नव्हतं हे लक्षात येतं. महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या टॅलेंट हंट शोमधून निलेश साबळेची महाराष्ट्राला ओळख झाली. पुढे ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या विविध पर्वांचे निवेदन करत, त्यातील विनोदी प्रहसनांचं लेखन करत स्वतःची एक वेगळी ओळख त्यानं निर्माण केली. ‘फू बाई फू’ नंतर ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आला आणि त्यानं मनोरंजनाची व्याख्याच बदलली. मराठी नाटक आणि चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठीचं हे हक्काचं व्यासपीठ बनलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajesh Deshmukh: Rajesh Deshmukh: पुण्यातील सहा रुग्णालयांनी केला ‘हा’ प्रताप!; कठोर कारवाई अटळ – mahatma jyotiba phule jan arogya yojana action will be taken...

पुणे: रुग्णांना ‘ महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना ’ अंतर्गत मिळणारे लाभ न देणाऱ्या सहा रुग्णालयांची योजनेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी शिफारस...

Bihar election: पासवान यांचे श्राद्ध; चिराग नितीशकुमारांचे पाया पडले, पण मन मोकळं केलं तेजस्वीकडे – bihar election nitish kumar chirag paswan tejaswi yadav sat...

पाटणाः विधानसभा निवडणुकीपूर्वी ( bihar election ) बिहारच्या राजकारणाचे ३ सर्वात महत्वाचे चेहरे मंगळवारी एकाच ठिकाणी दिसले. पटणातील एलजेपी कार्यालयात रामविलास पासवान यांच्या...

Recent Comments