Home आपलं जग करियर nirf ranking 2020: Top Engineering Colleges in India 2020: देशातील टॉप १०...

nirf ranking 2020: Top Engineering Colleges in India 2020: देशातील टॉप १० इंजिनिअरिंग कॉलेज – nirf ranking 2020 list of top 10 engineering colleges in india


नवी दिल्ली:
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज एनआयआरएफ इंडिया रँकिंग २०२० जाहीर केले. एनआयआरएफचे म्हणजे राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी थेट वेबसाइटद्वारे एनआयआरएफ इंडिया रँकिंग २०२० जाहीर केले. एनआयआरएफ इंडिया रँकिंग पाच निकषांवर आधारित आहे. ते पाच मापदंड म्हणजे अध्यापन, शिक्षण आणि साधने, संशोधन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस, पदवीधर आणि सर्वसमावेशकता.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास यावर्षी एकूण ८९.९३ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. त्यानंतर, आयआयटी दिल्ली ८८.०८ च्या गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई ८५.०८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढे सर्व 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी पाहू शकता.

रँक संस्थेचे नाव स्कोअर
भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास ८९.९३
भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली ८८.०८
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ८५.०८
भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर ८२.१८
भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर ८०.५६
भारतीय तंत्रज्ञान संस्था रुरकी ७६.२९
भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी ७४.९०
भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद ६६.४४
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था तिरुचिराप्पल्ली ६४.१०
१० इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदूर ६२.८८

देशातील टॉप १०० इंजिनीअरिंग महाविद्यालयांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

गतवर्षीही आयआयटी मद्रासने ८९.०५ स्कोरसह अव्वल स्थान मिळविले. मागील वर्षी आयआयटी दिल्ली ८५.३६ स्कोरसह दुसऱ्या स्थानी होती. आयआयटी मुंबईचे स्थान ८४.४० गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर तर आयआयटी खडगपूर ७९.४१ स्कोरसह गुणांसह चौथ्या क्रमांकावर आणि आयआयटी कानपूर ७७.५७ स्कोरसह सह पाचव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: NIRF India Ranking 2020: IIT मद्रास देशात टॉपSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Farmers agitation: जिल्हाधिकारी कार्यालयात उधळला भाजीपाला – aurangabad farmers agitation for announce wet drought and compensation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसातत्याने होत असलेली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील उभे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई तातडीने द्यावी; तसेच जिल्ह्यात ओला...

tejashwi yadav public rally: तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल भिरकावली, एक चुकली तर दुसरी फेकली – bihar election a pair of slippers hurled at rjd...

औरंगाबाद: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ( bihar election ) राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते अनेक शहरांमध्ये रॅली आणि जाहीर प्रचारसभा घेत आहेत. याच...

Recent Comments