Home शहरं पुणे nisarga cyclone: पुणे जिल्ह्याला 'निसर्ग'चा फटका; दोघांचा मृत्यू तर दोन जखमी -...

nisarga cyclone: पुणे जिल्ह्याला ‘निसर्ग’चा फटका; दोघांचा मृत्यू तर दोन जखमी – nisarga cyclone two dead and two injured in pune district


पुणेः ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील खेड आणि हवेली तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आह. तसेच वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मोकरवाडी येथील प्रकाश किसन मोकर (वय ५२) आणि खेडमध्ये वहागाव येथील मंजाबाई अनंत नवले (वय ६५) यांचा मृत्यू झाला. वहागाव येथे आणखी दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. ‘वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्ये ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसला. या तालुक्यांतील अनेक गावांमधील झाडे उन्मळून पडली, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली. मोकर हे घरावरील उडालेला पत्रा पकडत असताना पत्र्यासहीत ते हवेत उडून जमिनीवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मंजाबाई नवले यांचा घराची भिंत कोसळून मृत्यू झाला असल्याचे बनोटे यांनी सांगितले.

वेल्हे तालुक्यात तीन शाळा व एका ग्रामपंचायतीच्या छतावरील पत्रे उडून गेले. सर्वाधिक नुकसान मुळशी तालुक्यात झाले आहे. या ठिकाणी ७९ घरांचे नुकसान झाले आहे. ३६ झोपड्या उद्धवस्त झाल्या आहेत. मुळशी आणि खेड तालुक्यात तीन जनावरांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे, असं विठ्ठल बनोटे म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Katrina Kaif Covid-19 Test Before Shoot Watch Video – कतरिना कैफने शेअर केली तिची करोना टेस्ट, लवकर सुरू करणार शूटिंग

मुंबई- करोना व्हायरसचा वाढा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. सिनेसृष्टीतही यातून सुटली नाही. अनेक निर्बंधासह शूटिंगचं काम तातडीने बंद...

Recent Comments