Home शहरं मुंबई nisarga cyclone: मुंबईकरांना दिलासा ! निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला; रेड अलर्ट कायम...

nisarga cyclone: मुंबईकरांना दिलासा ! निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला; रेड अलर्ट कायम – mumbai safe from cyclone nisarga; cyclone will weaken into a cyclonic storm by late evening


मंबईः रौद्ररुप धारण केलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका आता टळला असल्याची माहिती स्कायमेट या संस्थेनं दिली आहे. चक्रीवादळ आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेन सरकलं आहे. वादळ मुंबईच्या बाजुनं पुढं सरकलं असलं तरीही हवामान खात्यानं दिलेला धोक्याचा इशारा मात्र कायम आहे.

दुपारी १२.३० ते २.३० च्या दरम्यान अलिबागला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. या काळात १०० ते ११० किमी प्रति तास वेगानं वारे वाहत होते. तर दुपारी अडीच वाजता वादळ मुंबईपासून ७५ किमी अंतरावर असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. अलिबागनंतर हे वादळ मुंबई आणि ठाण्याच्या दिशेनं सरकत होते पण वादळाने दिशा बदलल्यानंतर ते आता धुळे किंवा नाशिकला धडकण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबई व पुण्यालाही बसला. मुंबईत सकाळपासूनचं सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. वादळी वाऱ्यामुळं मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती.

वाचाः ‘निसर्ग’चं रौद्ररुप; झाडं, विजेचे खांब उन्मळून पडले

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टयामुळं सुमारे ११.३० च्या सुमारास चक्रीवादळ निर्माण झाले. मुंबईत निसर्ग वादळाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली होती. मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली होती. तर, खबरदारी म्हणून मुंबईतील सहा चौपाट्यांवर रेस्क्यू बोट, जेट स्कीसह ९३ जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्राच्या किनारी भागातून आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांनी सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.

कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरून घोंगावत आलेले वादळानं रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच नुकसान केलं आहे. वादळानं दिशा बदलल्यानं वाऱ्याचा जोरही वाढला आहे. मुंबई- पुण्यात अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर काही भागांत वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मुंबई विमानतळावर आज उतरलेले फेडेक्स कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले. निसर्ग वादळामुळं निर्माण झालेली परिस्थिती पाहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आलं होतं.

निसर्ग वादळ: पुढचे सहा तास महत्त्वाचे, तीव्रता कमी होण्याची शक्यताSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments