Home महाराष्ट्र Nisarga Cyclone News: जूनमधील दोन वर्षातलं दुसरं तीव्र चक्रीवादळ; निसर्ग १०० वर्षांचा...

Nisarga Cyclone News: जूनमधील दोन वर्षातलं दुसरं तीव्र चक्रीवादळ; निसर्ग १०० वर्षांचा विक्रम मोडणार? – will nisarga be 2nd severe june cyclone in 2 years


मुंबई : भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीच्या अंदाजानुसार निसर्ग हे तीव्र चक्रीवादळ ठरलं तर १९०८ नंतर पहिल्यांदाच अरबी समुद्रात सलग दोन वर्षे चक्रीवादळ येण्याची ही वेळ असेल. कारण, गेल्या वर्षीही वायू चक्रीवादळ आलं होतं. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात हे वादळ ९ जून रोजी गेल्या वर्षी आलं होतं. अरबी समुद्रात यापूर्वी सलग दोन वर्षे जूनमध्ये चक्रीवादळ १९०२ आणि १९०३ मध्ये आले होते. यानंतर पुन्हा जून १९०७ आणि १९०८ या सलग दोन वर्षात पुन्हा तीव्र चक्रीवादळ तयार झालं. आता शंभर वर्षांच्या खंडानंतर वायू आणि निसर्ग चक्रीवादळाचा या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.

आयएमडीचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या किनाऱ्यातून चक्रीवादळ जाणे ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती असते. १८९१ पासून असलेल्या नोंदींनुसार आतापर्यंत फक्त तीन चक्रीवादळे आली आहेत.

निसर्ग वादळाची प्रत्येक लाइव्ह अपडेट पाहा

‘हवामानशास्त्रानुसार, वर्षाला उत्तर भारतीय महासागरात पाच चक्रीवादळांची निर्मिती होते, ज्यात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचाही समावेश आहे. साधारणपणे बंगालच्या उपसागरात चार आणि अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होतं. अरबी समुद्रात चक्रीवादळ ही दुर्मिळ बाब आहे. अरबी समुद्रात तयार होणारं एक वादळ हे सर्वसाधारणपणे गुजरात किंवा ओमनच्या दिशेने जातं,’ अशी माहिती मोहपात्रा यांनी दिली. दरम्यान, २०१९ या वर्षात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात आठ चक्रीवादळांची नोंद झाली होती.

अभ्यासानुसार, १९९० पासून अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळांची संख्या वाढत आहे. ‘वातावरण बदलाचा हा परिणाम आहे का याबाबत लोक विचार करतात. पण याचा संबंध लावू शकत नाही. तीव्र चक्रीवादळे का वाढत आहेत, याचा शोध घेण्यासाठी पुरेशा संशोधनाची गरज आहे’, असं मोहपात्रा म्हणाले.

निसर्ग वादळाचे काउंटडाउन सुरू; मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाचा जोर

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी ११.३० च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले असून, बांगलादेशने सुचवल्याप्रमाणे निसर्ग असे नामकरण झालेले हे चक्रीवादळ आज दुपारी अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने सरकत असून पहाटे पाच वाजताच्या मुंबईपासून हे वादळ २५० तर अलिबागपासून २०० किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर साडेसहा वाजताच्या स्थितीनुसार वादळ मुंबईपासून २०० व अलिबागपासून १५५ किमी अंतरावर आणि साडेसात वाजता हे अंतर अनुक्रमे १९० आणि १४० किमी इतकं कमी झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Navi Mumbai Municipal Corporation: गुड न्यूज! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही नाट्यगृहांना मिळणार भाडे सवलत – navi mumbai municipal corporation has decided take discount to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यप्रयोग सुरू व्हावेत म्हणून नाट्यसृष्टीकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या प्रयत्नांना...

Srinagar terror attack: Srinagar Terror Attack: महाराष्ट्राचा वीरपुत्र यश देशमुख काश्मिरात शहीद; धक्क्याने आई बेशुद्ध – yash deshmukh martyred in terrorist attack in srinagar

जळगाव: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २२ वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद...

Recent Comments