Home शहरं औरंगाबाद Nitin gadkari: नीतीमत्ता सांभाळून उद्योग करावा - entrepreneurs should do business by...

Nitin gadkari: नीतीमत्ता सांभाळून उद्योग करावा – entrepreneurs should do business by taking care of ethics, finance and environment says union minister nitin gadkari


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘उद्योग, शेती, पर्यटन, स्टार्टअप्ससाठी भविष्यकाळ उज्ज्वल आहे. नवउद्योजकांनी नीतीमत्ता, अर्थकारण, पर्यावरण या तीन गोष्टी सांभाळून व्यवसाय व उद्योग करावा,’ असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) अंतर्गत मराठवाडा अॅक्सलरेटर फॉर ग्रोथ इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक) च्या इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. यावेळी ते बोलत होते. ‘सीएमआयए’ अध्यक्ष कमलेश धूत, मॅजिकचे संचालक आशिष गर्दे, प्रसाद कोकिळ, रितेश मिश्रा आदींसह उद्योजक उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. गडकरी यांनी उद्योग शेती, पर्यटन आणि स्टार्ट अप्ससाठी संशोधन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘जगभरात वाहनांच्या उत्पादनाचा प्रवास झपाट्याने बदलत आहे. प्रदूषण नियंत्रण करण्यास मदत होणारी वाहने उत्पादित केली जात आहेत. स्टार्टअप्सनी पर्यायी इंधनाबाबत संशोधन करण्याची गरज आहे. ‘बायोसीएनजी’, ‘एलएनजी’ आदी काही उदाहरणे आहेत. त्याकडे उद्योजकांनी लक्ष दिले पाहिजे. मोठी वाहने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना वाहनांचे सुटे भाग कमीत कमी आयात करावेत, स्थानिक लघुउद्योगांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी होणारा त्रास सहन करा, काही कालावधीनंतर आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लघुउद्योजक स्थिरावतील, असे सूचविले आहे. त्यातून निश्चितच फायदेशीर बाबी पुढे येतील.’ आशिष गर्दे यांनी प्रास्तविक केले. कमलेश धूत यांनी उद्योगविषयक मागण्या मांडल्या. रितेश मिश्रा यांनी मॅजिकच्या वाटचालीची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे केली. प्रसाद कोकिळ यांनी आभार मानले.

मेट्रो प्रकल्पावर विचार करा

रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. विदर्भात ३६ ट्रेनचा प्रस्ताव आहे. मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पाबाबत विचार केला, तर औरंगाबाद – नांदेड, नांदेड – लातूर, सोलापूर – औरंगाबाद दरम्यान या सेवा सुरू करता येतील. या प्रकल्पाचे बिझनेस मॉडेल कसे आहे, याबाबत गडकरांनी सविस्तर माहिती दिली. कृषीपूरक उद्योग सुरू करण्यावर भर द्यावा, नवीन संधींकडे स्टार्टअप्सनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments