Home शहरं नागपूर Nitin gadkari: Nitin Gadkari तुकाराम मुंढेंचे काय होणार; केंद्रीय मंत्र्याने टाकला 'लेटर...

Nitin gadkari: Nitin Gadkari तुकाराम मुंढेंचे काय होणार; केंद्रीय मंत्र्याने टाकला ‘लेटर बॉम्ब’! – nitin gadkari write complaint letter to pmo against tukaram mundhe


नागपूर: ‘मी ना लबाड आहे, ना खोटारडा’, असे निक्षून सांगत महापौर संदीप जोशी यांचे आरोप फेटाळून लावणारे नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच तक्रार केली आहे. ( Nitin Gadkari on Tukaram Mundhe )

तुकाराम मुंढे यांनी अवैध, बेकायदेशीर, भ्रष्ट आणि घटनाबाह्य कृती केल्याचा गंभीर आरोप करणारा ‘लेटर बॉम्ब’ नितीन गडकरी यांनी टाकला आहे. मुंढे यांच्या कारभाराविरुद्ध गडकरी यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे तक्रार केली आहे.

वाचा: मी ना लबाड, ना खोटारडा; चोख प्रत्युत्तर

नागपूर महापालिका ( Nagpur Municipal Corporation ) आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अवैधरित्या ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’चं सीईओपद बळकावल्याचा गंभीर आरोप गडकरी यांनी आपल्या पत्रात केला आहे. करोना संकटकाळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करणे, निविदा रद्द करणे यासारखी कामे मुंढे यांनी केल्याचा आरोपही गडकरी यांच्या पत्रात करण्यात आला आहे. नागपूर महापालिकेचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली असून गडकरी यांनी ही तक्रारही आपल्या पत्रासोबत जोडली आहे. मुंढे यांच्यावर याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही गडकरी यांनी सरकारकडे केली आहे.

गडकरींनी दिला होता इशारा

‘महापौरांचा अवमान म्हणजे नागपूरचा अवमान आहे. महापालिकेतील कारभारावर माझे बारकाईने लक्ष आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात येईल’, असा गर्भित इशारा तीनच दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी महापालिका आयुक्तांना अप्रत्यक्षपणे दिला होता. पक्षाच्या व्यासपीठावर बोलताना त्यांनी शहरातील घडामोडींवर पहिल्यांदाच भाष्य केले होते. ‘शांत राहा, संयम बाळगा’, अशी सूचनाही त्यांनी जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना केली होती. ‘ स्मार्ट सिटी प्रकल्प मी आणला. यात केंद्राचाही सहभाग आहे. स्मार्ट सिटीसाठी कृष्णा खोपडे यांनी बरेच प्रयत्न केले. रामनाथ सोनवणे कंटाळून सोडून गेले, काही अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केले. बँकेतून पैसे काढले, खात्याचे नाव बदलले. सरकारची परवानगी घेणे आवश्यक होते. मनात येईल, तसे बदल करताना आयुक्तांनी नागपूरचा खासदार म्हणून मला एका शब्दानेही विचारले नाही. ते कुणालाही मोजत नाहीत. हे बरोबर नाही. कुणीही असो, असा कारभार खपवून घेता येत नाही. या सर्व घडामोडींची गंभीर दखल घेतली आहे, यातून लवकरच मार्ग काढू’, असे गडकरी म्हणाले होते. त्यानंतर लगेचच गडकरी यांनी मुंढे यांच्यावर ‘लेटर बॉम्ब’ टाकला आहे.

वाचा: महापालिकेच्या सभेत आयुक्त मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी, आयुक्त सभा सोडून निघाले

तक्रारीची चौकशी

संदीप जोशी यांच्या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, तक्रार दाखल झाल्यानंतर दोन दिवस या तक्रारीची प्रतच आर्थिक गुन्हेशाखेकडे पोहोचली नव्हती. स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची मंजुरी व अधिकार नसताना आयुक्त मुंढे यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून कंत्राटदारांना १८ कोटींची रक्कम अदा करीत गैरव्यवहार व फसवणूक केली, अशी तक्रार महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलिस स्टेशनमध्ये केली होती.

वाचा: ‘यूपी, बिहारकडे लक्ष द्या, महाराष्ट्राच्या विकासाचे आम्ही पाहू’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MAH MCA CET 2020: MAH MCA CET 2020 चे हॉलतिकीट जारी – mah mca cet 2020 admit card released, download here

MAH MCA CET 2020 Admit Card: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी MAH MCA CET 2020 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट...

love jihad: महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा वाद, पण हा शब्द आला कुठून? – love jihad origin controversy explained in bareilly and after tanishq advertisement

'लव्ह जिहाद' या शब्दावरून देशात काही ठिकाणी वाद सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ; रिकव्हरी रेटही वाढला – maharashtra reports 8,142 new covid 19 cases and 23,371 discharges in the...

मुंबईः राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील...

Recent Comments