Home मनोरंजन Nivedita Saraf Recipes video : मालिकेतली आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण -...

Nivedita Saraf Recipes video : मालिकेतली आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण – agga bai sasubai fame asavari aka nivedita saraf recipes


मुंबई: करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशातही रुग्णांचा आकडा वाढतो आहे. संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारद्वारे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान शुटिंग रद्द असल्यानं सिनेसृष्टीतील मोठे सेलिब्रिटी देखील घरी बसून आहेत. ते स्वतः तर घरी राहतच आहेत शिवाय चाहत्यांनाही घरात बसण्याचा सल्ला ते वेळोवेळी देत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या घरी कामाला येणाऱ्यांनाही त्यांनी घरी बसण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळंच सध्या सेलिब्रिटी मंडळी घरातली कामं करताना दिसत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या त्यांचा हा वेळ सत्कारणी लावत आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ या देखील त्यांच्या आवडत्या गोष्टी करताना दिसतायेत. छंद जोपासत आहेत.

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतून त्या आसावरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेत आसावरीला स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आसावरी एक उत्तम सुगरण आहे आणि तिच्यासारखंच निवेदिता यांना देखील स्वयंपाक करायला खूप आवडतो. ‘मला जेवण करून खायला घालायला खूप आवडतं, खूप लोक माझ्या घरी माझ्या हातचं जेवून जातात त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा असं मला वाटतं,’ असं निवेदिता म्हणतात.


लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत निवेदिता त्यांच्या घरी रोज वेगवेगळे पदार्थ बनवत असततात. त्यांच्या रेसिपीज चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांचं स्वत:चं युट्यूब चॅनेलही असून त्यावर त्यांचे स्वयंपाक करतानाचे अनेक व्हिडिओ आहेत.निवेदिता यांनी नुकताच ‘व्हेजिटेबल स्टीव्ह’ या पदार्थाची रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यांना देखील ही रेसिपी आवडली असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रियांकाने पाठवले खास बूट

दरम्यान, प्रेक्षक आसावरी या व्यक्तिरेखेला खूप पसंत करत आहे. आई, सून, सासू हि प्रत्येक भूमिका चोख बजावणारी आसावरी हि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली आहे.

महाभारताच्या ‘या’ सीनमध्ये तुम्हाला दिसला का ‘कुलर’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

terrorist attack in Srinagar: दहशतवाद्यांचा गोळीबार, नागरिकांना वाचवताना दोन जवान शहीद – two security personnel killed in terrorist attack in jammu and kashmir, srinagar

नवी दिल्ली : गुरुवारी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या श्रीनगर शहरात सेनेच्या पेट्रोलिंग टीमवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन जवानांना आपले प्राण...

children engage in mobile games: व्हर्च्युअल खेळांमध्ये अडकतेय बालपण – most of children are engage their time in virtual games

म. टा. प्रतिनिधी, नाशिकशालेय वयोगटातील मुला-मुलींच्या हाती मोबाइल देण्याचे पालक टाळत आले असले तरी, यावर्षी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल विद्यार्थ्यांच्या हातात द्यावाच लागत आहे....

Recent Comments