Home विदेश North Korea Kim Jong Un: किम जोंग यांची लष्करासोबत बैठक;'या' निर्णयावर शिक्कोमोर्तब?...

North Korea Kim Jong Un: किम जोंग यांची लष्करासोबत बैठक;’या’ निर्णयावर शिक्कोमोर्तब? – north korea’s kim vows to further bolster nuclear war deterrence


प्योंगयांग: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी लष्करासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत उत्तर कोरियाच्या अणवस्त्र कार्यक्रमाला आणखी बळकटी देण्याची योजना आखण्यात आली असल्याची चर्चा आहे. अमेरिकेसोबत शांतता चर्चा बस्तानात गेल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत.

सरकारी वृत्तसंस्था केसीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या सत्तारूढ वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय लष्कराच्या आयोगाची बैठक झाली. या बैठकीत किम जोंग उन स्वत: हजर होते. जवळपास तीन आठवड्यानंतर किम यांनी उपस्थिती दाखवली आहे. या बैठकीत सुरक्षा दलाला अधिक मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली असल्याचे समजते. त्याशिवाय उत्तर कोरियाच्या विरोधी देशांकडून निर्माण करण्यात येणाऱ्या लहान-मोठ्या आव्हानांना कसे तोंड देता येईल यावरही चर्चा करण्यात आली. उत्तर कोरियाने एप्रिल महिन्यात क्षेपणास्त्र चाचणी केली होती. त्यानंतर किम यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर किम हे दोन-तीन आठवडे अज्ञातवासात होते. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीची उलटसुलट चर्चा सुरू होती. अखेर एक मे रोजी एका खत कारखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते लोकांसमोर आले आणि चर्चेला पूर्ण विराम दिला. हा खत कारखाना कोरियाच्या अणवस्त्र कार्यक्रमाला मदतशीर ठरणारा असल्याचे वृत्त आहे.

वाचा: किम यांनी उद्घाटन केलेल्या कारखान्यापासून जगाला धोका!
वाचा: करोना: अखेर चीन नमले; आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी तयार

अमेरिकेसोबत उत्तर कोरियाची चर्चा सुरू होती. यामध्ये उत्तर कोरियाच्या अणवस्त्र कार्यक्रमांबद्दलही चर्चा होणार होती. त्यानंतर ही निष्फळ ठरली. दरम्यान, रशिया आणि चीनला इशारा देण्यासाठी अणुचाचणी करण्याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने १५ मे रोजी चर्चा केल्याचे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ने दिले आहे. अमेरिकेने १९९२नंतर अणुचाचणी केलेली नाही. रशिया आणि चीन यांनी नुकतीच कमी क्षमतेची अणुचाचणी केल्याचे वृत्त असून, दोन्ही देशांनी त्याचा इन्कार केला आहे. पण, जर अमेरिकेने अणुचाचणी केलीच, तर जगात पुन्हा अण्वस्त्रस्पर्धा सुरू होण्याची भीती या वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या चाचणीने जगावर मोठे परिणाम होऊ शकतात, असेही या वृत्तात म्हटले आहे.

आणखी वाचा:
किम जोंगच्या आहारात ‘हे’ खास सूप आणि महागडी वाईन!
आजोबा, वडिलांचे छायाचित्र हटवले; किम यांच्या प्रकृतीची पुन्हा चर्चाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Recent Comments