Home देश nurse injects herself with poison: भोपाळ: २३ वर्षीय नर्सने स्वत:ला टोचून घेतले...

nurse injects herself with poison: भोपाळ: २३ वर्षीय नर्सने स्वत:ला टोचून घेतले विष, झाला मृत्यू – 23 year old nurse injects herself with poisonous chemical dies in bhopal


भोपाळ: एका नर्सने आपल्या रहात्या घरात स्वत:ला विषारी रसायनाचे इंजेक्शन टोचून कथित आत्महत्या केल्याची घटना घडली. या नर्सच्या कुटुंबीयांना रविवारी ही नर्स राहत्या घरी बेशुद्धावस्तेत आढळली. ही घटना गांधी नगरात घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मनिषा सोलंकी असे या २३ वर्षीय नर्सचे नाव आहे.

मृत नर्सच्या कुटुंबींना तिच्या स्कुटरशेजारी एक रिकामी सीरिंज आढळली. नर्सने सुसाईड नोटही लिहिल्याचे तिच्या कुटुंबीयांना आढळलेले नाही. नर्सच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून त्यानंतर तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

त्या दिवशी ही नर्स नाइट शिफ्टनंतर सकाळी ८ वाजता घरी पोहोचली. घरी आल्यानंतर ती थेट बेडरूममध्ये गेली. ती नाइट शिफ्ट करून आल्याने थकली असेल असे समजून कुणीही तिला कसलाही त्रास दिला नाही. मात्र, कुटुंबीय तिच्या सकाळी ९ वाजता तिच्या बेडरूमध्ये गेले असता ती बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांना आढळले.

या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस तिच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्ड्स तपासत आहेत. तसेच, तिच्या कुटुंबातील सर्वांचे जबाबही नोंदवत आहेत. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bharatiya Kisan Sabha: ‘शेतकऱ्यांचं संपूर्ण थकीत वीज बिल माफ व्हायला हवं होतं’ – bharatiya kisan sabha leader ajit navale welcome state budget but expect...

हायलाइट्स:अजित पवारांनी मांडला महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्पशेतकऱ्यांना थकीत वीज बिलात ३३ टक्के सूटभारतीय किसान सभेनं केलं अर्थसंकल्पाचं स्वागत, पण व्यक्त केली अपेक्षाअहमदनगर:...

covid 19 vaccine: करोना लसः रजिस्ट्रेशन करताना ‘या’ चुका करू नका – covid 19 vaccine online 5 things to be careful about while registering

हायलाइट्स:करोना लस देशात उपलब्ध असून ती अनेकांनी घेतली आहे लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे या लस संबंधी कोणीही काहीही मागितले तर त्यावर...

Kunkeshwar Fair: करोनाचा धसका! श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं साजरी होणार – sindhudurg: kunkeshwar fair of devgad cancelled due to coronavirus

हायलाइट्स:राज्यात करोनानं पुन्हा खाल्ली उचलधार्मिक कार्यक्रम, यात्रांवर निर्बंधकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्राही रद्दसुरेश कौलगेकर । सिंधुदुर्गदक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र...

Recent Comments