Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल oneplus 8 : 'वनप्लस ८' सीरिज भारतात लाँच, पाहा किंमत - oneplus...

oneplus 8 : ‘वनप्लस ८’ सीरिज भारतात लाँच, पाहा किंमत – oneplus 8 priced at rs 41,999, oneplus 8 pro will cost rs 54,999; delivery to begin in may after lockdown


नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) ने आपली लेटेस्ट ८ सीरिज भारतात लाँच केली आहे. ग्राहकांना आता या सीरिज अंतर्गत वनप्लस ८ आणि वनपल्स ८ प्रो स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साइट, स्टोर आणि ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवरून खरेदी करता येवू शकणार आहे. कंपनीने या फोनसोबतच भारतीय बाजारात वनप्लस बुले झेड ईयरफोन सुद्धा लाँच केला आहे.

वाचाः
रिलायन्स जिओची JioLink सर्विस, १०७६ GB डेटा मिळणार

वनप्लस ८ आणि ८ प्रो ची किंमत

कंपनीने वनप्लस ८ ५जीला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजमध्ये भारतात लाँच केले आहे. या स्मार्टफोनची किंमत ४१ हजार,९९९ रुपये, ४४ हजार ९९९ रुपये आणि ४९ हजार ९९९ रुपये आहेत तर वनप्लस ८ प्रोच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये, आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.वाचाः

Honor 20e स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

वनप्लस बुलेट झेड ईयरफोनची किंमत

कंपनीने या ईयरफोनची किंमत १,९९९ रुपये ठेवली आहे. वनप्लस ८ सीरिज सोबत ईयरफोन ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. कंपनीने आता पर्यंत या डिव्हाईसच्या विक्री संदर्भात अद्याप काही माहिती दिली नाही.

OnePlus 8 चे फीचर्स

या फोनमध्ये ६.५५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. वनप्लसने या फोनमध्ये फ्लूड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी ओआयएस आणि ईआयएस, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक मायक्रो सेन्सर सह ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. स्टोरेजसाठी २५६ चा पर्याय देण्यात आला आहे. फोनमध्ये ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

वाचाः
४ रियर कॅमेऱ्याचा Oppo A92s लाँच, पाहा किंमत-फीचर

OnePlus 8 Pro चे फीचर्स

वनप्लस ८ प्रो मध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले, क्यूएचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसोबत येतो. डिस्प्लेत एक कन्फर्ट झोन फीचर आहे. या फोनमध्ये दिलेला सर्वात बेस्ट डिस्प्ले असल्याचा कंपनीचा दावा आहे. या डिस्प्लेला मॅटए प्लस सर्टिफिकेट मिळाले आहे. वनपल्स ८ प्रो डिस्प्ले १० बिट कलर डेप्थ सपोर्ट करते. फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसेच ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, ३एक्स टेलिफोटो कॅमेरा व एक कलर फिल्टर कॅमेरा दिला आहे. वनप्लस ८ प्रोमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पीकर्स असल्याने डॉल्बीचा फील येणार आहे. या फोनमध्ये ४५१० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा फोन केवळ ३० मिनिटात ५० टक्के चार्ज होऊ शकतो. वनप्लस ८ प्रो कंपनीच्या ऑक्सिजन ओएसवर चालतो. या फोनमध्ये न्यू डार्क थीम, डायनामिक वॉलपेपर, लाइव्ह कॅप्शन यासारखे नवीन फीचर मिळतील.

वाचाः
व्होडाफोन-आयडिया युजर्संना झटका, ही ऑफर बंद

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

Recent Comments