Home शहरं पुणे online cheating: ऑनलाइन टीव्ही विकायला गेला; ३९ हजार गमावून बसला - pune:...

online cheating: ऑनलाइन टीव्ही विकायला गेला; ३९ हजार गमावून बसला – pune: man loses rs 39000 rs to online fraudsters


पुणे: ओएलएक्सवरून टीव्ही विकणे बाणेर भागातील व्यक्तीला चांगलेच महागात पडले. टीव्ही खरेदीच्या बहाण्याने चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन ३९ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रचित गुप्ता (वय ३६, रा. बाणेर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बाणेर परिसरातील पॅनकार्ड रस्ता परिसरात राहतात. त्यांना त्यांचा जुना टीव्ही विकायचा होता. त्यासाठी त्यांनी ओएलएक्सवर ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्या ठिकाणी संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक ही दिला होता. एका व्यक्तीने त्यांना संपर्क साधून टीव्ही खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. टीव्हीचे पैसे ऑनलाईन पाठविण्यासाठी त्यांच्याकड़ून बँकेचे डिटेल्स घेतले. त्यानंतर त्यांना व्हॉट्सअप क्रमांकावर एक क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगितला. तक्रारदार यांनी तो कोड स्नॅक केल्यानंतर तक्रारदार यांच्या खात्यामधून ३९ हजार रुपये दुसऱ्या खात्यावर पाठविण्यात आल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यानी पोलिसांकडे तक्रार दिली.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिक कारागृहात मृत्यू

ओएलएक्सवरून जुन्या वस्तू खरेदी अथवा विक्री करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन वारंवार सायबर पोलिसांकडून केले जात आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष भेटल्याशिवाय कोणाही आर्थिक व्यवहार करू नये. व्यक्ती खरी असल्याचे पटल्यानंतरच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Paytm चा इशारा, या एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंटSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

शिवसेना-भाजपला मिळाले सभापतीपद

म. टा. वृत्तसेवा, येथील महानगरपालिकेच्या स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी ( दि २७ ) ऑनलाइन पद्धतीने...

aurangabad News : ‘स्मार्ट सिटी’साठी आणखी दीडशे कोटी – rs 150 crore more for ‘smart city’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून आणखीन १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासनाने दिलेल्या निधीच्या...

Recent Comments