Home आपलं जग करियर online classes: ऑनलाइन वर्गच झाला हॅक! विद्यार्थी सायबर गुन्हेगारीचे बळी - cyber...

online classes: ऑनलाइन वर्गच झाला हॅक! विद्यार्थी सायबर गुन्हेगारीचे बळी – cyber crime in increasing among school students during online classes


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून सरकारने ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आता विद्यार्थी सायबर गुन्ह्याचे बळी ठरले आहेत. वांद्रे येथील एका शाळेने ऑनलाइन वर्गासाठी वापरत असलेला अॅपच हॅक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर अंधेरीतील एका शाळेत हॅकिंगचा वापर करुन नववीच्या ऑनलाइन वर्गात दुसऱ्या इयत्तेचा विद्यार्थी सहभागी झाला आणि त्याने असंसदीय कमेंट टाकण्यास सुरुवात केली. याबाबत पुढे तपास केल्यावर असे लक्षात आले की तो संबंधित विद्यार्थी त्याच वेळेत त्याच्या ऑनलाइन वर्गात होता. यामुळे हा कोणा तिसऱ्याच प्रकार असल्याचे समोर आले आहे. तर आणखी एका प्रकरणात ऑनलाइन वर्गात एका अनोळखी व्यक्तीने शिरकाव करून असंसदीय संदेश पाठविण्यास सुरुवात केली. यानंतर त्या शाळेने ऑनलाइन वर्ग थांबविण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता बहुतांश शाळांनी हजेरी घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वर्गात नेमके कोण-कोण आहेत हे शिक्षकांना समजू शकणार आहे.

अनेक वर्गांना आदल्या दिवशी त्यांच्या वर्गाचा मिटींग आयडी आणि पासवर्ड येतो असे असतानाही हा शिरकाव कसा होतो ,याबाबत पालक चिंतेत आहेत. तर विद्यार्थी सायबर गुन्हेगारीचे बळी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. दरम्यान, अनेक शाळांनी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना अवलंबविण्यास सुरुवात केली आहे. तरीही अधिक सुरक्षा बाळणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

८० टक्के विद्यार्थी सायबर गुन्हे लपवतात

इंटरनेटचा वापर यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये अत्यल्प जागरुकता असल्याचे समोर आले आहे. जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांचा अनुभवास येणारे गैरप्रकार लपवण्याकडे कल असल्याचे रिस्पॉन्सिबल नेटिझन, सायबर पीस फाउंडेशन आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत तरी ऑनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, त्याचवेळी सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याचा धोका विद्यार्थ्यांभोवती आहे. सायबर गुन्ह्याची शिकार झालेले १० ते १७ या वयोगटातील ८० टक्के विद्यार्थी हे घडलेली घटना लपवत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. शिक्षक, पालक, पोलिस अशा कुणालाही विद्यार्थी माहिती देत नाहीत. दरम्यान शाळांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक सजग असावे असे मत रिस्पॉन्सिबल नेटिझन्सचे संस्थापक उन्मेश जोशी यांनी मांडले. सध्या याबाबत अनेक सायबर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यास तयार आहेत त्यांचे सहकार्य घ्यावे असे मतही त्यांनी मांडले.

सर्वेक्षणातील निरीक्षणे

– राज्यातील १८ शाळांमधील १० ते १७ वयोगटातील म्हणजेच सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

– ३३ टक्के विद्यार्थी मजकूर किंवा तपशील डिलिट करतात.

– ३१ टक्के विद्यार्थी पालक किंवा मोठ्यांऐवजी मित्रांना आलेला अनुभव सांगतात.

– साधारण ४६ टक्के विद्यार्थ्यांनी उपकरणांच्या आहारी गेल्यामुळे अभ्यासावर परिणाम होत असल्याचे उत्तर दिले आहे.

– अकाऊंट हॅक होणे, धमक्या, अश्लील मजकूर, अनोळखी व्यक्तीकडून छळ अशा प्रकारांना जवळपास ३७ टक्के विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले आहे.

– व्हॉट्सअ‍ॅप आणि टिकटॉक या अ‍ॅपचा सर्वाधिक वापर विद्यार्थ्यांकडून होत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi To Visit Punes Serum Institute Of India On Saturday – PM Modi: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून...

sangli crime: Sangli Crime: चुलती व पुतण्याची आत्महत्या; कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले – sangli crime aunt and nephew commit suicide

सांगली:तासगाव तालुक्यातील हातनूर येथे चुलती आणि तिच्या पुतण्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) पहाटे घडला. अनुराधा गणेश सुतार आणि...

Recent Comments