Home देश पैसा पैसा online ITR filling extended up to 31st May 2020 : ऑनलाइन विवरणपत्र...

online ITR filling extended up to 31st May 2020 : ऑनलाइन विवरणपत्र भरण्याची सुविधा ३१ मे पर्यंत – online itr submission extended up to 31st may 2020


ईटी वृत्त, मुंबई : प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी भरायच्या कर विवरणपत्राचे अर्ज अद्याप उपलब्ध करून दिलेले नाहीत. या अर्जाची अधिसूचिना चालू महिनाअखेर काढली जाणार आहे. त्यानंतर ऑनलाइन प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची सुविधा ३१ मे पर्यंत उपलब्ध होईल, असे प्राप्तिकर विभागाने कळवले आहे. यामुळे करदात्यांना विवरणपत्रात भरायच्या तपशीलाचा विचार करण्यास अवधी मिळणार आहे.

प्राप्तिकर कायदा, १९६१ अंतर्गत सरकारने वेगवेगळ्या मुदतवाढी दिल्या आहेत. या मुदतवाढी टॅक्सेशन अॅण्ड अदर लॉज (रिलॅक्सेशन ऑफ सर्टन प्रोव्हिजन्स) ऑर्डिनन्स, २०२० अंतर्गत देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने (सीबीडीटी) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने कोविड-१९ संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आर्थिक तपशीलाबाबत लवचिक धोरण अवलंबले आहे. यामुळे विवरण अर्जांची पुनर्रचना करण्यात येत आहे. करदात्यांना ३० जूनपर्यंत मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ घेता यावा यादृष्टीने विवरण अर्जांत सुधारणा करण्यात येत आहे. यामुळे १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या काळातील व्यवहारांवरही करदात्यांना करलाभ मिळवता येणार आहे. एकदा नव्या विवरणपत्र अर्जांची अधिसूचना जारी झाल्यानंतर प्राप्तिकर विभाग आपल्या संगणकीय प्रणालीमध्ये तसे बदलही करणार आहे. त्यामुळे ऑनलाइन विवरणपत्र भऱताना करदात्यांना कुठलीही समस्या निर्माण होणार नाही. परिणामी, प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची सुविधा यंदा ३१ मे व त्यानंतर उपलब्ध होणार आहे.

प्राप्तिकर विभाग होता तयार

सर्वसाधारणपणे दरवर्षी प्राप्तिकर विभाग विवरणपत्राची अधिसूचना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जारी करतो. त्यामुळे विवरणपत्राचे अर्जही तेव्हाच उपलब्ध होतात. करनिर्धारण वर्ष २०२०-२१ साठी ऑनलाइन विवरणपत्र भरण्याची सुविधा १ एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापूर्वी ३ जानेवारी रोजी आर्थिक वर्ष २०१९-२० साठी आयटीआर-१ (सहज) व आयटीआर-४ (सुगम) यांची अधिसूचना जारी झाली होती. परंतु आता हे दोन्ही अर्ज पुनर्रचित स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.

प्राप्तिकर विभागाने दिलेली सुविधा

– प्राप्तिकर कलम ८० सी ः या अंतर्गत आयुर्विमा, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या गुंतवणुका यांच्या नोंदणी विवरणपत्रात वजावटीसाठी करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ.

– प्राप्तिकर कलम ८० डी ः स्वतःसाठी, स्वतः व जोडीदार तसेच आईवडिलांसाठी उतरवलेल्या आरोग्यविम्याचा प्रीमियम नोंदवण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ.

– प्राप्तिकर कलम ८० जी ः विविध प्रकारच्या दिलेल्या देणग्यांचा तपशील देण्यासही ३० जूनपर्यंत मुदतवाढ.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Chitra Wagh: पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ – pawar saheb i miss you very much since this morning says...

हायलाइट्स:'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी...

petrol rate hike: पेट्रोल-डिझेल महागले; तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका – petrol diesel rate hike today after three day pause

हायलाइट्स:पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा इंधन दरवाढ केली.याआधी सलग तीन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते.आज पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल १७...

Sanjay Raut Praises Uddhav Thackeray: ‘उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी; कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत’ – uddhav thackeray is mr. satyawadi, says shiv sena...

मुंबई: 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत. अत्यंत जागरूक व न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,' असा दावा शिवसेनेचे...

Recent Comments