Home मुंबई नवी मुंबई online pizza booking fraud: ऑनलाइन पिझ्झा तब्बल ६१ हजारांना पडला; पाहा नेमके...

online pizza booking fraud: ऑनलाइन पिझ्झा तब्बल ६१ हजारांना पडला; पाहा नेमके काय घडले? – navi mumbai cyber crime : panvel woman looted by unknown gang while online pizza booking


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

पनवेलमधील एका महिलेला ऑनलाइन पिझ्झा मागवणे भलतेच महागात पडले आहे. एका अज्ञात टोळीने या महिलेला ऑनलाइन पिझ्झा बुकिंग करण्याच्या बहाण्याने तिच्या मोबाइल फोनवर लिंक पाठवून त्या लिंकच्या माध्यमातून पेमेंट करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातून ६१ हजार २९८ हजाराची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या अज्ञात टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

वाचा: रामदेव बाबांनी आणलेल्या कोरोनील औषधावरून नवा वाद

या प्रकरणात फसवणूक झालेली ३४ वर्षीय महिला पनवेलमध्ये कुटुंबासह राहात असून २० फेब्रुवारी रोजी रात्री त्यांच्या मुलीने त्यांना पिझ्झा ऑर्डर करण्यास सांगितले होते. त्यानुसार या महिलेने गुगलवरून मिळालेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधल्यानंतर फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने पिझ्झाची ऑर्डर घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने पेमेंट ऑनलाइन करणार का, असे विचारुन त्यांना दोन लिंक पाठविल्या. या दोन्ही लिंकवर या महिलेने क्लिक करून पेमेंट केले.

वाचा: ‘त्या’ प्रकरणानंतर राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधील कटुता वाढली!

मात्र त्यानंतर या महिलेच्या क्रेडिट कार्डवरून ९९९९, २४,९९९, २५००० आणि १३०० अशी रक्कम भलत्याच खात्यावर वळती झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधल्यानंतर त्यांची रक्कम एरॉन-गुरगाव, ड्रीम इलेव्हन, पेटीएम अशा तीन खात्यांत गेल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वाचा: मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या बॉडीगार्डला धक्काबुक्कीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : ‘भारत माता की जय’ म्हणत पंतप्रधान मोदींनी फुंकले प.बंगालच्या निवडणुकीचे रणशिंग | National

2:19 pm (IST) राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत - नितेश राणे 'शिवसेनेच्या प्रकल्पाविरोधाचं कारण वेगळं' राजन साळवींचाही प्रकल्पाला पाठिंबा - नितेश...

pm modi rally in kolkata live updates: pm modi rally live update : PM मोदींची कोलकात्यात प्रचारसभा, भाषण सुरू… – pm modi rally in...

कोलकाताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर प्रचारसभा होत आहे. या सभेला हजारो नागरिक आले आहेत. पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं...

जातपंचायतीची बहिष्कारनीती सुरूच

म. टा. प्रतिनिधी, समाजमनावरील जातपंचायतीची दहशत उधळून लावल्याची घटना म्हसरूळ (ता. नाशिक) येथे ताजी असतानाच आता सिन्नरमध्ये जातपंचायतीने तरुणावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार...

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Recent Comments