Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल oppo smartphone price cut: Oppo A12, A15, F17 आणि रेनो 3 प्रोच्या...

oppo smartphone price cut: Oppo A12, A15, F17 आणि रेनो 3 प्रोच्या किंमतीत कपात, जाणून घ्या नवी किंमत – these oppo smartphone have got cheaper by up to rs 2,000


नवी दिल्लीः Oppo ने आपले बजेट स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने ए सीरीज, एफ सीरीज आणि रेनो ३ प्रो स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. Oppo A12, Oppo A15, Oppo F17 आणि Oppo Reno 3 Pro च्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात केली आहे. महेश टेलिकॉमने ओप्पोच्या या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.

वाचाः ओप्पोच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा

ओप्पो ए12 आणि ओप्पो ए15 च्या किंमतीत कंपनीनी एक हजार रुपयांची कपात केली आहे. ओप्पो ए १२ च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या किंमतीत १ हजार रुपयांच्या सूटनंतर ८ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. तर ओप्पो ए १५ च्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनला १ हजार रूपयांच्या सूटनंतर ८ हजार ९९० रुपयांत खरेदी करु शकता. ए १५ ए चा ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा फोन १ हजार रुपयांच्या सूटनंतर ९ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकतो.

वाचाः जिओ, एयरटेल आणि BSNLचे सर्वात महाग ब्रॉडबँड प्लान्स, मिळते 1Gbps ची स्पीड

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ओप्पो एफ १७ च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर हा फोन १८ हजार ४९० रुपयांत खरेदी करू शकता. तर ओप्पो रेनो ३ प्रोच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर १ हजार रुपयांची सूट दिली असून यानंतर हा फोन २४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या हँडसेटच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनवर २ हजार रुपयांच्या कपातीनंतर २७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः Whatsapp वर नवे फीचर, व्हिडिओ पाठवताना आणि स्टेट्स ठेवताना होणार हे बदल

वाचाः Airtel vs Jio vs Vi vs BSNL: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्रीपेड प्लान

वाचाः Apple iPhone 12 च्या डिस्प्लेत हा प्रोब्लेम सुरू, युजर्स झाले चिंताग्रस्त

वाचाः वोडाफोन-आयडियाचा स्वस्त प्लान, २६९ रुपयांत ५६ दिवसांची वैधताSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments