Home देश padma awards 2021: पद्म पुरस्कार २०२१; नामांकने दाखल करण्याची ही आहे अंतिम...

padma awards 2021: पद्म पुरस्कार २०२१; नामांकने दाखल करण्याची ही आहे अंतिम तारीख – padma awards 2021 nomination last date


नवी दिल्लीः २०२१ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकने किंवा शिफारशी दाखल करण्याची सुरुवात १ मे २०२० रोजी झाली होती. ही नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२० आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने आणि शिफारशी पद्म पुरस्कारांच्या https://padmaawards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन दाखल करता येतील.

पद्म पुरस्कारांमध्ये मुख्यत्वे पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी असलेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. १९५४ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. अतिशय उत्तम कार्य केलेल्यांचा सन्मान करण्याचा या पुरस्कारांचा उद्देश आहे. कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय आणि असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. समुदाय, व्यवसाय, पत किंवा लिंग याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. सार्वजनिक उपक्रमात डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता, सार्वजनिक उपक्रमांसह सरकारी कर्मचारी या पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

२०२३ पर्यंत धावणार खासगी ट्रेन, भाडे मात्र रेल्वेच ठरवणार

पुतीन यांना मोदींनी दिल्या शुभेच्छा; दोघांमध्ये झाली ही महत्त्वाची चर्चा

पद्म पुरस्कारांचे जनतेच्या पद्म पुरस्कारांमध्ये रुपांतर करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणूनच या पुरस्कारांसाठी आपल्या स्वतःच्या नामांकनासह नामांकने आणि शिफारशी पाठवाव्यात अशी विनंती सर्व नागरिकांना करण्यात येत आहे. या नामांकनांमध्ये आणि शिफारशींमध्ये वर उल्लेख केलेल्या पद्म पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात सर्व तपशील समाविष्ट असला पाहिजे. शिफारस केलेल्या व्यक्तीच्या संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय आणि असामान्य कामगिरीची माहिती या तपशीलामध्ये जास्तीत जास्त ८०० शब्दांमध्ये कथन केलेली असली पाहिजे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालये, विभाग, राज्ये, केंद्रशासित प्रदेशांची सरकारे, भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते, उच्च गुणवत्ता संस्था यांना अशी विनंती केली आहे की त्यांनी महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांमधून खऱ्या अर्थाने सर्वोत्तम आणि असामान्य कामगिरी करणाऱ्या गुणवत्ताप्राप्त व्यक्तींची निवड करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. या संदर्भात अधिक तपशील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ( www.mha.gov.in ) या वेबसाईटवर ऍवॉर्ड्स अँड मेडल्स या विभागात उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित निकष आणि नियम वेबसाईटवर https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकवर उपलब्ध आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gabba Test: IND vs AUS : सामन्याचा दुसरा दिवस पावसानेच गाजवला, पाहा दोन्ही संघांची स्थिती – ind vs aus : play on day 2...

ब्रिस्बेन, IND vs AUS : चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस पावसानेच गाजवल्याचे पाहायला मिळाले. पण पाऊस येण्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर...

JEE Main Application: JEE Main 2021: परीक्षा अर्ज भरण्याची आज अखेरची मुदत – jee main 2021 last date for application today

JEE Main 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शनिवार १६ जानेवारी हा अखेरचा दिवस आहे. परीक्षेचे आयोजन करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी शनिवारी अॅप्लिकेशन विंडो बंद...

apple store offer: Apple ची जबरदस्त ‘ऑफर’, प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची ‘कॅशबॅक’ – apple store offering rs. 5,000 cashback on orders over rs. 44,900,...

नवी दिल्लीः Apple Store ने भारतात आपल्या ग्राहकांसाठी ५ हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरचा फायदा त्याच ग्राहकांना मिळणार जे ग्राहक...

Recent Comments