Home विदेश Pakistan news: खळबळजनक! पाकिस्तान जमा करतोय अणवस्त्रे; भारत निशाण्यावर! - Pakistan Continues...

Pakistan news: खळबळजनक! पाकिस्तान जमा करतोय अणवस्त्रे; भारत निशाण्यावर! – Pakistan Continues To Have Nuclear Weapons Stock German Report


बर्लिन: देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी असताना पाकिस्तान अणवस्त्रांचा साठा सातत्याने वाढवत असल्याचे समोर आले आहे. जर्मन सरकारच्या एका अहवालात पाकिस्तानचा हा छुपा कार्यक्रम उघड करण्यात आला आहे. पाकिस्तानला याकामी चीनचाही पाठिंबा मिळत असल्याचे समोर आले आहे.

जर्मनीने १६ जून २०२० रोजी प्रकाशित केलेल्या या अहवालात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालानुसार पाकिस्तान, इराण, उत्तर कोरिया आणि सीरिया या देशांमध्ये घातक शस्त्रांची निर्मिती होत आहे. या घातक शस्त्रांमध्ये अणवस्त्रे, रासायनिक आणि जैविक शस्त्रांचाही समावेश आहे. हे देश अवैधरीत्या जर्मनीकडून घातक शस्त्रे बनवण्यासाठी सुट्टे भाग खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीने शस्त्रांची निर्मिती करणे हे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी गंभीर धोका असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पाकिस्तान राबवत असलेला अणवस्त्र कार्यक्रम हा भारताविरोधात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जूनमध्ये स्वीडनमधील थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिप्री) पाकिस्तानकडे १६० अणूबॉम्ब असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अणूबॉम्ब आहेत.

वाचा: चीनकडून सुरू आहे ‘ही’ तयारी; भारतानेही कंबर कसली
वाचा: खळबळजनक! गलवान खोऱ्यात हिंसाचार झालेल्या ठिकाणी चीनचे बंकर
जर्मनी सरकारच्या अहवालात जर्मनीतील संस्था, उद्योगांना गंभीर इशाराही देण्यात आला आहे. पाकिस्तानसारख्या देशांना तंत्रज्ञान देणे, सुट्टे भाग देणे हे घातक ठरू शकते. अहवालानुसार, सुट्टे भाग जमवून, तंत्रज्ञानाच्या आधारे पाकिस्तानसारखे देश घातक शस्त्रनिर्मिती करू शकतात. घातक अस्त्रांची निर्मिती करणे, त्याची देखभाल आदी सारख्या कामात पाकिस्तान हा पाश्चिमात्य देशांवर अवलंबून आहे.

वाचा: धक्कादायक खुलासा…करोनामुळे कोसळले कराचीत विमान!

दरम्यान, भारत आणि चीनने मागील वर्षीच आपल्या अणवस्त्रांच्या साठ्यात वाढ केली असल्याचे ‘सिप्री’च्या अहवालात म्हटले आहे. भारताकडील अणवस्त्रांची संख्या ही चीनच्या तुलनेत निम्मी आहे. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे १५० आणि चीनकडे ३२० अणूबॉम्ब आहेत. मागील एका वर्षात चीनने ३० तर भारताने १० अणूबॉम्बची निर्मिती केली आहे. पाकिस्तानकडेही भारताच्या तुलनेत अधिक अणूबॉम्ब असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानकडे १६० अणूबॉम्ब आहेत. पाकिस्तानकडे भारताच्या तुलनेत अधिक अणवस्त्र असली तरी भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या अणवस्त्रविरोधी क्षमतेवर विश्वास आहे. आशियातील या तीन देशांमध्ये अणवस्त्रांची संख्या वाढत असताना जगात मात्र अणवस्त्रांच्या संख्येत घट होत आहे. जगातील एकूण ९० टक्के अणवस्त्रे असलेल्या अमेरिका आणि रशिया आपल्याकडील अणवस्त्र नष्ट करत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

Recent Comments