Home देश pakistani spy drone: पाकिस्तानचं कारस्थान उघड, हत्यारांची वाहतूक करणारा ड्रोन पाडला -...

pakistani spy drone: पाकिस्तानचं कारस्थान उघड, हत्यारांची वाहतूक करणारा ड्रोन पाडला – pakistani spy drone carrying weapons shot down by bsf at kathua, jammu kashmir


श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कठुआ भागात सीमा सुरक्षा दलानं (BSF) एक पाकिस्तानी ड्रोन पाडला. या ड्रोनमधून ७ ग्रेनेड, यूएस मेड एम-४ रायफल, दोन मॅगझिन, ६० राऊंड गोळ्या जप्त करण्यात आली आहेत. हा ड्रोन आकारानं मोठा असल्याचंही दिसून येतंय. या ड्र्रोनमधून अली भाई नावाच्या व्यक्तीला या हत्यारांचा पुरवठा केला जात होता.

शनिवारी सकाळी ५.१० मिनिटांनी ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. कठुआ जिल्ह्यातील पानसर भागात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेतून हा ड्रोन सुटू शकला नाही.

पानसर भागात आंतरराष्ट्रीय सीमेनजिकच्या चौकीजवळ (Bo) हेरगिरी करणारा हा ड्रोन आढळला. सीमा सुरक्षा दलाच्या कर्तव्य क्षेत्रात (Area of Responsibility – AOR) हा ड्रोन घिरट्या घालत होता.

maharashtra times

पाकिस्तानी ड्रोनमधून हत्यारं जप्त

सीमा सुरक्षा दलाचे सहाय्यक निरक्षक (SI, BSF) देवेंदर सिंह यांनी या ड्रोनवर ८ राऊंड फायर केले आणि ड्रोन जमिनीवर पाडला. २५० मीटरच्या भारतीय हद्दीत पडलेल्या या ड्रोनला ताब्यात घेण्यात आलं.

त्यानंतर ड्रोनची पडताळणी केल्यावर हेरगिरी आणि दहशतवादी हत्यारांच्या वाहतुकीसाठी हा ड्रोन वापरला जात असल्याचं समोर आलंय.

maharashtra times

पाकिस्तानी ड्रोनमधून हत्यारं जप्त

या ड्रोनच्या सहाय्यानं पाकिस्तानातून काश्मीरमध्ये हत्यारं पोहचवण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, दक्ष भारतीय जवानांनी पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडले.

या अगोदरही अनेकदा भारतीय सुरक्षा दलाकडून कुपवाडा, राजौरी आणि जम्मू सेक्टरमध्ये या पद्धतीच्या हत्यारांच्या तस्करीचा भांडाफोड करण्यात आलाय.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.५० च्या सुमारास हिरानगर सेक्टरच्या बबिया चौकीवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात बीएसएफनं या गोळीबाराला प्रत्यूत्तर देणं टाळलं.

पाकिस्तानकडून जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये सक्रीय ठेवण्यासाठी पाकिस्तानकडून हत्यारांचा पुरवठा केला जातो. परंतु, एकीकडे लडाख भागात भारत चीन दरम्यान तणाव शिगेला पोहचला असताना दुसऱ्या बाजुनं पाकिस्तानकडूनही केल्या जाणाऱ्या दहशती कारवायांवर सुरक्षा दलाचं चोख लक्ष आहे.

वाचा :भारत चीन तणाव : अल्पसूचनेत हवाई हल्ल्यासाठी भारताची लढाऊ विमाने सज्ज!
वाचा :Air Force : शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; वायू सेना प्रमुख कडाडले
वाचा :एक इंच जमीनही बळकावण्याची हिंमत करू नका, PM मोदींचा चीनला इशारा
वाचा :India-China border issues: चिनी सैनिकांनी घुसखोरी केली नाहीः PM मोदी
वाचा :अक्साई चीन परत मिळवणं कठीण, पण अशक्य नाही : जामयांग नामग्यालSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pimpri Chinchwad: Pimpri chinchwad: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड – pimpri chinchwad man vandalised vehicles after his sister love marriage

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने १२ वाहनांची तोडफोड केली. तसेच हातात कोयता घेऊन परिसरात साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण...

manish sisodia: School Reopen News in Delhi – शिक्षक-पालकांत अजूनही करोनाची धास्ती! शाळा बंदच राहणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून काही ठराविक राज्यांत २१ सप्टेंबरपासून शाळा महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी अनेक राज्यांत आजही शाळा-महाविद्यालय...

Recent Comments