Home महाराष्ट्र Palghar : पालघर येथील कंपनीला भीषण आग; धुराचे लोळ पसरल्याने घबराट -...

Palghar : पालघर येथील कंपनीला भीषण आग; धुराचे लोळ पसरल्याने घबराट – fire broke out at a company in palghar


पालघर: पालघर येथील मनोरी जवळील नेटाळी येथे आज दुपारी अरिहंत कंपनीला भीषण आग लागली. प्लास्टिक सदृश्य उत्पादन करणाऱ्या या कंपनीत लागलेल्या आगीने अवघ्या काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. आग आणि धुराचे लोळ दूरवर पसरल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली होती. या कंपनीत अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत असून लॉकडाऊनच्या काळातही कंपनी सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत.

नेटाळी येथे डोंगर पायथ्याशेजारी निर्मनुष्य ठिकाणी ही कंपनी आहे. या कंपनीपासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर वस्ती आहे. रिसॉर्टमध्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबर घसरत येण्यासाठी प्लास्टिक सदृश्य स्लाइड्स वापरले जातात. त्या स्लाइड्सचे उत्पादन या कंपनीत केले जाते. आज दुपारी या कंपनीला भीषण आग लागल्याने आग लागल्याचं आधी कुणाला कळलं नाही. मात्र नंतर आगीने रौद्ररुप धारण केल्याने एकच गडबड उडाली. काही लोक जीवाच्या आकांताने कंपनीबाहेर पडले तर काहीजण या कंपनीत अडकून पडले. या कंपनीत अनेकजण अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे. प्लास्टिक सदृश्य उत्पादनाने भराभर पेट घेतल्यानेही आग आणखी भडकली. शिवाय मोकळया मैदानावर कंपनी असल्याने हवेमुळेही आग आणखीनच भडकली. बघता बघतात धुराचे प्रचंड लोळ संपूर्ण परिसरात पसरले. अगदी एक किलोमीटरच्या परिसरापर्यंत धुराचे लोळ पसरल्याने आजूबाजूच्या वस्तीतील लोकही घाबरून गेले आहेत.

पालघर घटना दोन धर्मांमधला संघर्ष नाही: सीएम

दरम्यान, घटनास्थळी अग्निशन दलाच्या गाड्या कधीच पोहोचल्या आहेत. गेल्या अर्ध्यापाऊण तासांपासून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीकडे जाणारे दोन्ही रस्तेही बंद करण्यात आले असून सर्व सामान्यांना या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आग लागण्याचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.

पालघरमधल्या घटनेची लाज वाटते, गंभीरची टीका

धुळे आणि पालघरमध्ये करोनाचे दोन रुग्ण सापडले

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments